संजीवनी शैक्षणिक संस्था

संजीवनी के.बी.पी. पॉलीटेक्निकच्या मेकॅट्रॉनिक्स विभागाची उत्कृष्ट  निकालाची परंपरा कायम

संजीवनी के.बी.पी. पॉलीटेक्निकच्या मेकॅट्रॉनिक्स विभागाची उत्कृष्ट  निकालाची परंपरा कायम

मेकॅट्रॉनिक्स विभागाची अनुष्का ससाणेे ९६. ४२ टक्के गुण मिळवुन पाचव्या सत्रात सर्व प्रथम
कोपरगांव विजय कापसे दि ३१ जानेवारी २०२५ महाराष्ट्र  राज्य तंत्र शिक्षण  परीक्षा मंडळाने हिवाळी परीक्षा २०२४ मध्ये घेतलेल्या विषम  सत्र परीक्षांचे निकाल जाहिर केले असुन यात संजीवनी के. बी. पी. पॉलीटेक्निकच्या तृतिय वर्ष मेकॅट्रॉनिक्स विभागाची अनुष्का संतोष  ससाणेे हिने ९६. ४२ टक्के गुण मिळवुन सर्व प्रथम क्रमांकाने उत्तिर्ण होण्याचा बहुमान पटकाविला आहे. यात अंतिम वर्षाच्या  पाचव्या सत्राचा सरासरी निकाल ९२ टक्के लागला असुन संजीवनी पॉलीटेक्निकने आपल्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे, अशी माहिती संजीवनी पॉलीटेक्निकने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

जाहिरात

              पत्रकात पुढे म्हटले आहे की तृतिय वर्ष  मेकॅट्रॉनिक्स विभागात आदिती रविंद्र भागवत हिने ९५. ०५ टक्के गुण मिळवुन दुसरा व पियुष निळकंठ रोठेे याने ९४. ६३ टक्के गुण मिळवुन तिसरा क्रमांक मिळविला आहे. तृतिय वर्षाच्या कॉम्प्युटर टेक्नालॉजी विभागात साईतेज संदीप वाबळे याने ९५. ६७ टक्के गुण मिळवुन प्रथम क्रमांक मिळविला. तर याच विभागात अनुष्का नितिन मगर हीने ९५. ४४ टक्के गुण मिळवुन दुसरा व श्रावणी उमेश  गायकवाड व यज्ञा उदय बोठे यांनी ९५. २२ टक्के गुण मिळवुन तिसरा क्रमांक मिळविला. मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या तृतिय वर्षात प्रिती विजय नाईकवाडी हिने ९१. ७१ टक्के गुण मिळवुन पहिला क्रमांकाने उत्तिर्ण झाली. ओमकार दिलीप मोरेने ८९. २४ टक्के व साक्षी नवनाथ वर्दे हीने अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला. तृतिय वर्षाच्या  इलेक्ट्रिकल इंजिनिअरींगच्या कृष्णा शशिकांत  लोखंडेने ९३. ३३ टक्के गुण मिळवुन या विभागात प्रथम क्रमांकाने उत्तिर्ण होण्याचा बहुमान मिळविला. याच विभागात प्रियंका संजय वाघ व निखिल संतोष  पवार यांनी अनुक्रमे ९२. ६०  व ९२ टक्के गुण मिळवुन दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला. तृतिय वर्षाच्या  सिव्हिल इंजिनिअरींग विभागात क्षितिजा सुभाष  हरळे हीने ९२. ९० टक्के गुण मिळवुन पहिल्या क्रमांकाने उत्तिर्ण झाली. तर मिस्बा जावेद शेख व मृणाल श्रीपाद भागवत यांनी अनुक्रमे ८८. ६० व ८६. ६० टक्के गुण मिळवुन दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला.

जाहिरात आत्मा

            दुसऱ्या वर्षाचे  निकाल पुढील प्रमाणे. मेकॅट्रॉनिक्स विभाग-वैष्णवी  बाबासाहेब मापारी (९१. ८९ टक्के, प्रथम), ट्विंकल हरेश  चौधरी (९१. ७८ टक्के, द्वीतिय) व सिध्दी संदीप भाकरे (९१. ११ टक्के, तृतिय). कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी विभाग-शुभम प्रकाश  पवार (९७. ४१ टक्के, प्रथम), स्तिमित सतीश  आढाव (९६. ७१ टक्के, द्वीतिय) व सुमित पोपट कांबळे (९६. ५९ टक्के, तृतिय). मेकॅनिकल  इंजिनिअरींग विभाग-श्रेयश  नारायण शिनगारे  (८७. ५६ टक्के, प्रथम), गिरीश प्रविण तांदळे (८७. ४४ टक्के, द्वीतिय) व शिवम गोरक्षनाथ देशमुख (८४. ७८ टक्के, तृतिय). इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभाग-मयुर ज्ञानेश्वर भटाटे (९२.२४4 टक्के, प्रथम), योगेश  रामदास तुरकणे (९१. ७७ टक्के, द्वीतिय) व नंदिनी सचिन मगर (९०. ७१ टक्के, तृतिय). सिव्हिल इंजिनिअरींग विभाग-देविदास बापु काळणे (९२. १२ टक्के, प्रथम), श्रावणी सतीश सोनाजे (९१. ६५ टक्के, द्वीतिय) व पुणम विजय अभंग (८५. १८ तृतिय).

जाहिरात

          प्रथम वर्षाचे  निकाल पुढील प्रमाणे.मेकॅट्रॉनिक्स विभाग-अनुष्का संतोष  पगार (९१. ८८ टक्के , प्रथम), वसुंधरा मुकूंद बोचरे (८९. ०६ टक्के ,द्वीतिय) व क्रिष्णा  बंडू निंगुरकर (८९. ०६ टक्के, तृतिय). कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी- दिशा अनिल दोंड (९५. १८ टक्के , प्रथम), भक्ती शिवाजी शेटे (९५. ०६ टक्के ,द्वीतिय) व विभुती बाळासाहेब औताडे आणि ओंकार संतोष  लोखंडे (९३. ५३ टक्के, तृतिय).मेकॅनिकल इंजिनिअरींग -श्रुष्टी रंगनाथ गुरसळ (९१. २९ टक्के , प्रथम), रेहनखान अर्शदखान पठाण (८९. ५३ टक्के , द्वीतिय) व अथर्व संजय होन (८८. २४ टक्के ,तृतिय). इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग-रेणुका भाऊसाहेब माताडे (८७. ७७ टक्के , प्रथम), तन्मय राजेंद्र सालके (८७. ०६ टक्के ,द्वीतिय ) व स्नेहा देविदास रोहम (८४. १२ टक्के , तृतिय). सिव्हिल इंजिनिअरींग-गौरव विष्णू तांबे (८३. २९ टक्के , प्रथम), समाधान गणेश जाधव  (९१. ८८ टक्के , द्वीतिय) व साईश  पंकज लोढा (८०. ४७ टक्के , तृतिय.)

जाहिरात

            संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी, प्राचार्य ए. आर. मिरीकर, डीन अकॅडमक्सि प्रा. के.पी. जाधव, सर्व विभाग प्रमुख व डीन्स यांचे अभिनंदन केले.   

संजीवनी कॉलेज

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे