विद्यार्थ्यांनो वाचा आणि मोठ्ठे व्हा- लक्ष्मण पंडोरे
विद्यार्थ्यांनो वाचा आणि मोठ्ठे व्हा- लक्ष्मण पंडोरे
विद्यार्थ्यांनो वाचा आणि मोठ्ठे व्हा- लक्ष्मण पंडोरे
कोपरगाव विजय कापसे दि २१ मार्च २०२४– आजच्या विद्यार्थ्यांनी अधिक अधिक वाचन करत अभ्यासाची गोडी निर्माण करत उच्च शिक्षण घेऊन मोठे व्हावे असे प्रतिपादन जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण पंडोरे यांनी तिळवणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संत सद्गुरू गाडगेबाबा महाराज सार्वजनिक वाचनालयाच्या पहिल्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण पंडोरे यांच्या अध्यक्षतेखाली शाळेच्या श्रद्धा सावळे, दिया शिंदे, खुशी शिंदे, अर्णव बागुल, मयूर शेळके यां विद्यार्थ्यांच्या हस्ते तरच वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष विष्णू रंगनाथ वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत उदघाटन झाले.
या प्रसंगी मुख्याध्यापक पंडोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,जीवनात वाचन किती महत्वाचे असते वाचनाने जीवन घडते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर अब्दुल कलाम यांनी पुस्तकांचे महत्व जीवनाला आकार कसे देते हे सांगितले होते नाचून मोठे होण्यापेक्षा वाचून मोठे व्हा असे बाबासाहेबांनी सांगितले होते त्या विचारांना आपल्या जीवनात आणून आपण सर्वांनी वाचते होऊया असा अनमोल संदेश विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक पंडोरे यांनी सांगितले.तर विष्णू रंगनाथ वाघ यांनी मुलांना पुस्तके वाचनाचे आवाहन केले.