संगमनेर

भाऊसाहेब गुंजाळ पा सह्याद्री विद्यालयाचे राष्ट्रीय पातळीवर नेत्रदीपक यश

भाऊसाहेब गुंजाळ पा सह्याद्री विद्यालयाचे राष्ट्रीय पातळीवर नेत्रदीपक यश
भाऊसाहेब गुंजाळ पा सह्याद्री विद्यालयाचे राष्ट्रीय पातळीवर नेत्रदीपक यश
जाहिरात

संगमनेर विजय कापसे दि ३० जानेवारी २०२५मध्य प्रदेश येथे झालेल्या रमण सायन्स अँड टेक्नॉलॉजी फाउंडेशन इंडिया यांच्यावतीने पाचव्या भारतीय प्राउद्योगिक महोत्सवात संगमनेर येथील भाऊसाहेब गुंजाळ पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सायंटिस्ट रोल प्लेसह विज्ञान अभिनव मॉडेल मध्ये नेत्रदीपक यश मिळवले असल्याची माहिती प्राचार्य के.जी खेमनर यांनी दिली आहे.

जाहिरात आत्मा
मध्य प्रदेश येथील बुरानपुर येथे एपीजे अब्दुल कलाम कौन्सिल ऑफ एम सायंटिस्ट इंडिया व नॅशनल कौन्सिल ऑफ टीचर्स सायंटिस्ट इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या पाचव्या औद्योगिक महोत्सवा शालेय विद्यार्थ्यांनी विविध उपकरणे सादर केली .यामध्ये सह्याद्री विद्यालयाच्या साई काथे यांनी सायंटिस्ट रोल प्ले मध्ये महर्षी कानाद या शास्त्रज्ञाची भूमिका साकारून तिसरा क्रमांक मिळवला.

जाहिरात

यामध्ये गोल्ड मेडल ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देऊन त्याचा सन्मान करण्यात आला. तर विज्ञान अभिनव मॉडेल सादरीकरणात प्रसाद सातपुते व साईश खेमनर, तसेच विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये साई भाबड व आयुष कोकणे या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून ब्रांझ मेडल व प्रशस्तीपत्रक पटकावले. या सर्व विद्यार्थ्यांचा जागतिक पातळीवरील शास्त्रज्ञांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . यावेळी संस्थेचे चेअरमन माजी आमदार डॉ सुधीर तांबे हेही उपस्थित होते. या सर्व विद्यार्थ्यांना अण्णासाहेब दिघे ,संतोष देशमुख व चेतन मुर्तडक यांचे मार्गदर्शन लाभले

जाहिरात

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात, संस्थेचे चेअरमन माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, सेक्रेटरी लक्ष्मणराव कुटे, सह सेक्रेटरी दत्तात्रय चासकर, रजिस्टर बाबुराव गवांदे मुख्याध्यापक के.जी खेमनर पर्यवेक्षक डीएम पवार पर्यवेक्षिका श्रीमती रणशूर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे