नाशिक शिक्षक मतदार संघ ९३.४८ % टक्के तर कोपरगाव तालुक्यात ९३.५८ टक्के मतदान; तब्बल ४५२२ शिक्षक मतदारांनी फिरविली मतदानाकडे पाठ
नाशिक शिक्षक मतदार संघ ९३.४८ % टक्के तर कोपरगाव तालुक्यात ९३.५८ टक्के मतदान; तब्बल ४५२२ शिक्षक मतदारांनी फिरविली मतदानाकडे पाठ
कोपरगाव मतदान केंद्र क्रमांक ७७ मध्ये पुरुष ६९० पैकी ६५६ तर स्त्री ३९२ पैकी ३७७ एकूण १०८२ पैकी १०३३ मतदान झाले
कोपरगाव मतदान केंद्र क्रमांक ७८ मध्ये पुरुष ७०७ पैकी ६४८ स्त्री ३७९ पैकी ३४८ एकूण १०८६ पैकी ९९६ मतदान झाले
टक्केवारी ९३.५८ तर १३९ शिक्षक मतदारांनी फिरविली पाठ
कोपरगाव विजय कापसे दि २६ जुन २०२४– महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदार संघा करिता आज बुधवार दि २६ जून रोजी नाशिक विभागीय मतदार संघातील नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार व जळगाव या पाच जिल्ह्यातील ५४ तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या मतदारसंघाकरीता मतदान प्रक्रिया संपन्न होत आहे.
या निवडणुकीत २१ उमेदवार रिंगणात असून यात महाविकास आघाडी कडून शिवसेना ठाकरे गटाचे ॲड. संदीप गुळवे, शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान आमदार किशोर दराडे, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून ॲड. महेंद्र भावसार तर कोपरगाव भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यातच खरी लढत होत आहे.
नंदुरबारएकूण मतदान-५३९३झालेले मतदान-५१८४टक्केवारी-९६.१२%मतदान न केलेले शिक्षक मतदार-२०९
धुळेएकूण मतदान-८१५९झालेले मतदान-७६५१टक्केवारी-९३.७७%मतदान न केलेले शिक्षक मतदार-५०८
जळगावएकूण मतदान- १३१२२झालेले मतदान-१२५००टक्केवारी-९५.२६%मतदान न केलेले शिक्षक मतदार-६२२
नाशिकएकूण मतदान-२५३०२झालेले मतदान-२३१८४टक्केवारी-९१.६३%मतदान न केलेले शिक्षक मतदार- २११८
अहमदनगरएकूण मतदान-१७३९२झालेले मतदान-१६३२७टक्केवारी-९३.८८%मतदान न केलेले शिक्षक मतदार-१०६५
शासन १०० टक्के मतदान व्हावे या साठी शिक्षकांच्या माध्यमातून वेगवेगळ्या पध्द्तीने जनजागृती करत असते परंतु शिक्षक मतदार संघात मतदार जनजागृती करण्यात आग्रेसर असलेल्या ४५२२ शिक्षक मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविणे ही नक्कीच लाजिरवाणी बाब आहे.