दूध दरवाढी साठी जवळके मध्ये रास्ता रोको आंदोलन; मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित
शेतकरी होत आहे आक्रमक
जाहिरात
कोपरगाव विजय कापसे दि २ जुलै २०२४– कोपरगाव तालुक्यातील जवळके चौफुली येथे सोमवार दि १ जुलै रोजी समस्त जवळके व पंचक्रोशी मधील सर्वपक्षीय ग्रामस्थांनी एकत्र येत दूध दरवाढीसाठी मोठ्या प्रमाणात रास्तारोको आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधले.
या प्रसंगी शिवसेना ठाकरे गटाचे युवासेना तालुकाप्रमुख विजय गोर्डे यांनी राज्य सरकारचा जोरदार निषेध करत येत्या पंधरा दिवसात दूध दरवाढ झाली नाही तर यापेक्षा मोठे सर्वपक्षीय आंदोलन उभे केले जाईल आणि ते आंदोलन फक्त जवळके चौफुली वर न करता संपूर्ण नगर जिल्ह्यात होईल असा इशारा गोर्डे यांनी शासनाला दिला तर या प्रसंगी अँड योगेश खालकर ,अँड रमेश गव्हाणे, रंगनाथ गव्हाणे , रामनाथ गव्हाणे , कैलास गव्हाणे उपसरपंच रामनाथ पाडेकर आदी शेतकऱ्यांनी मोठ्या पोट तिकडीने आपल्या भावना व्यक्त करत सरकारचा निषेध केला.जाहिरात