जेऊर पाटोदा ग्रामपंचायत ने राबवला वृक्षारोपनाचा उत्कृष्ट बिहार पॅटर्न
जेऊर पाटोदा ग्रामपंचायत ने राबवला वृक्षारोपनाचा उत्कृष्ट बिहार पॅटर्न
सर्वच ग्रामपंचायतीने याचे अनुकरण करणे काळाची गरज

कोपरगाव विजय कापसे दि १ मे २०२४– कोपरगांव शहर हद्दी लगत असलेल्या जेऊर पाटोदा ग्रामपंचायत हद्दीत सम्यक नगर येथे वृक्षारोपणाचा बिहार पॅटर्न राबविण्यात आला असून भर उन्हाळ्यात २२० विविध प्रकारच्या झाडांचे संवर्धन करण्यात आले आहे.

याबाबत ची सविस्तर माहिती अशी की, धुळे जिल्ह्यातील बिहारी नावाच्या गरीब शेतकऱ्याने वृक्ष लागवडीसह संगोपन संरक्षणाचा केलेला प्रकल्प यशस्वी ठरला त्यामुळे झाडे लावली तर ती जगवता येऊ शकतात व त्यांचे संरक्षण होऊ शकते हा विश्वास निर्माण झाला त्यामुळे व्यक्तीच्या नावाने हा वृक्षारोपणाचा बिहार पॅटर्न या नावाने सन २००८ पासून राबवण्यास राज्य सरकारने स्वीकारला असून अनुषंगाने तत्कालीन कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांनी हा प्रकल्प प्रभावी पणे राबवत अनेक वृक्षाचे रोपन करत संरक्षण केले.

याचेच उदाहरण कोपरगाव शहराच्या हद्दी लगत असलेल्या जेऊर पाटोदा ग्रामपंचायतीने हा प्रकल्प प्रभावी पणे राबवला असून सम्यक नगर येथे असलेल्या ओपन स्पेस चा वापर करण्यात आला या ठिकाणी विविध २२० झाडे लावत त्याचे संरक्षण केले. ग्रामसेवक कोतकर मॅडम, संदिप थोरात, सरपंच मनीषा सतिष केकान यांनी पुढाकार घेतला तर परिसरातील लोकांनी आवडी नुसार झाडे भेट दिली आज या ठिकाणी आवळा, पेरू चिकू, चिंच, बोर, आंबा, सतपरणी, नारळ, बेल, बांबू, वड, लिंब आदी अनेक प्रकारची झाडे लावली आहेत .
रोजगार सेवक अंभोरे व निकम बाई यांची या झाडाची देखरेख करण्याकरिता नेमणूक केली आहेत तर ग्रामस्थ चांगदेव सरोदे यांनी स्वतःच्या बोअरवेल चे पाणी मोफत उपलब्ध करून दिले असल्याची माहिती अरुण उदावंत यांनी दिली असे प्रकल्प ठिकठिकाणी राबविण्यात येणे आवश्यक आहे



