आपला जिल्हा

टाकळी शिवारातील बिबट्याला वन विभागाने केले ठार

टाकळी शिवारातील बिबट्याला वन विभागाने केले ठार

टाकळी शिवारातील बिबट्याला वन विभागाने केले ठार

कोपरगाव विजय कापसे दि १६ नोव्हेंबर २०२५गेल्या अनेक दिवसापासून अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील टाकळी येसगाव शिवारात धुमाकूळ घालत असलेल्या नरभक्षक बिबट्याला शनिवारी १५ नोव्हेंबर रोजी वनविभागाच्या पथकाने मध्यरात्री १२.३० ते १ वाजण्याच्या सुमारास टाकळी-धारणगाव-सोनारी रस्त्याच्या पाण्याच्या टाकीच्या जवळील शेतात २ गोळ्या घालून जागीच ठार केल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला आहे.

जाहिरात

 सविस्तर वृत्त असे की, की गेल्या आठवड्यात कोपरगाव तालुक्यातील टाकळी चर परिसरात या बिबट्याने एका ऊस तोडणी मजुराच्या ५ वर्षीय बालिकेवर हल्ला करत तिला ठार केल्याची घटना ताजी असतानाच लागलीच २ दिवसानंतर येसगाव येथे नवले वस्ती परिसरात एका ६० वर्षीय महिलेवर शेतात घास कापत असताना हल्ला करत तिला देखील जागीच ठार मारल्याने स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात आक्रमक होऊन रास्ता रोको केला या परिस्थितीचे गांभीर्य लक्ष्यात घेता आमदार आशुतोष काळे,माजी आमदार स्नेहलता कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे आदींनी शासन दरबारी संपर्क साधत सदर बिबट्याला ठार मारण्याची परवानगी मिळावी यासाठी प्रयत्न करत अखेर शासनाने संबंधित विभागाला सदर बिबट्याला ठार मारण्याचे आदेश दिले.

जाहिरात
सदर आदेशान्वे वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह पुणे येथील शार्प शूटर गेल्या आठवड्या भरापासून तंत्रज्ञानाचा वापर करत सदर बिबट्याच्या शोधण्यासाठी मोहीम राबवत होते आज अखेर शनिवारी मध्यरात्री सदर नरभक्षक बिबट्याला ठार केल्याने स्थानिकांसह तालुक्यातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडत या बिबट्याला ठार करण्यासाठी कोपरगाव,राहुरी,संगमनेर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक, वनमजूर तसेच पुणे येथील शार्प शूटर यांचे अभिनंदन करत आभार व्यक्त केले आहे.
जाहिरात
बिबट्याला ठार करण्यासाठी कायद्यात तरतूद करावी
दिवसेंदिवस मानवी वस्तीमध्ये बिबट्या, वाघ या जंगली प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढत असून यांनी अनेक पाळीव प्राण्यांसह मानवाचे जीव घेतले आहे.तरी शासनाने कायद्यात बदल करत या हिंस्र प्राण्यांना दिसताच क्षणी गोळ्या घालत ठार मारण्याचा कायदा अंमलात आणायला हवा अशी अनेकांची मागणी आहे .
ठार केलेल्या बिबट्या सह वन अधिकारी व शार्प शूटर

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे