संगमनेर

अमृतवाहिनी इंजि. कॉलेजच्या ११० विद्यार्थ्यांची निकालापूर्वीच नोकरीसाठी निवड

अमृतवाहिनी इंजि. कॉलेजच्या ११० विद्यार्थ्यांची निकालापूर्वीच नोकरीसाठी निवड

 

विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी समन्वयामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या पॅकेजवर थेट नोकरीच्या संधी – डॉ.व्यंकटेश

संगमनेर विजय कापसे दि १७ मे २०२५मा.शिक्षणमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्तेच्या विविध उत्कृष्ट मानांकनासह नॅक चा ए प्लस दर्जा असणाऱ्या अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज मधील विद्यार्थ्यांना विविध आंतरराष्ट्रीय कंपनीतील समन्वयामुळे निकालापूर्वीच नोकरीच्या संधी मिळाली असून नुकत्याच कॉम्प्युटर विभागातील ११० विद्यार्थ्यांची मोठ्या पॅकेजवर नोकरीसाठी थेट निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ.एम.ए.व्यंकटेश यांनी दिली आहे.

जाहिरात

विद्यार्थ्यांच्या नोकरी बाबत अधिक माहिती देताना प्राचार्य डॉ.व्यंकटेश म्हणाले की, मा. महसूलमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात मा.आ.डॉ.सुधीर तांबे व संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सौ.शरयूताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजने गुणवत्तेचे सर्व मानांकाने मिळवली आहेत. याचबरोबर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांमधील ग्रामीण भागातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालयासह नॅक ए प्लस दर्जा मिळवला आहे.

जाहिरात

विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांबरोबर असलेल्या समन्वयामुळे अनेक विद्यार्थ्यांना निकालापूर्वीच थेट नोकरीच्या संधी मिळाल्या आहेत. नुकत्याच कॉम्प्युटर विभागातील ११० विद्यार्थ्यांना टीसीएस, कॉग्निजंट, इन्फोसिस, गोदरेज इन्फोटेक, टाटा टेक्नॉलॉजी, एल.टी.आय या कंपन्यांमध्ये या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

जाहिरात

लवकरच येथे जुनीपियर सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्थापन होणार असून त्यानंतर चर्चासत्रे इंटरशिप व उद्योगासमोरील प्रत्यक्ष अनुभव मिळवण्याच्या संधी विद्यार्थ्यांना दिल्या जाणार आहेत. जपानी कंपन्यांमध्ये नोकरी मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना जपानी लँग्वेजचे प्रशिक्षणही या ठिकाणाहून दिले जात असून या आतापर्यंत २५० विद्यार्थ्यांनी यामध्ये प्राविण्य मिळवले आहे. तर विद्यार्थ्यांसाठी तांत्रिक बुद्धिमत्ता, बुद्धिमत्ता चाचणी, मुलाखतीचे मार्गदर्शन, वादविवाद स्पर्धा यांचे सातत्याने आयोजन होत असून प्रत्येक सत्रात विद्यार्थ्यांना उद्योग संस्थांना भेट देण्याची संधी दिली जाते. आतापर्यंत विद्यार्थ्यांनी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय हॅकॅथॉन स्पर्धेमधून १० लाख रुपयांची पारितोषिके मिळवली आहे.

या निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा.महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, मा.आ.डॉ.सुधीर तांबे, कार्यकारी विश्वस्त सौ.शरयूताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, डायरेक्टर अकॅडमिक्स डॉ.जे.बी.गुरव, प्राचार्य डॉ.एम.ए.व्यंकटेश, रजिस्टर प्रा.विजय वाघे, विभागप्रमुख डॉ.एस.के.सोनकर यांनी अभिनंदन केले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे