आपला जिल्हा

टाकळीची प्रतीक्षा एमपीएससी मधून बनली वर्ग १ राजपत्रित अधिकारी

टाकळीची प्रतीक्षा एमपीएससी मधून बनली वर्ग १ राजपत्रित अधिकारी
टाकळीची प्रतीक्षा एमपीएससी मधून बनली वर्ग १ राजपत्रित अधिकारी
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १४ मे २०२५कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथील कन्या  प्रतिक्षा बाळासाहेब देवकर हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे  घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा मधून संपूर्ण राज्यातून ४२ वा आणि महिलांमधून १० वा क्रमांक मिळविला असून प्रतिक्षा देवकर  हिची सहाय्यक कार्यकारी अभियंता ( वर्ग १ राजपत्रित अधिकारी ) या पदावर निवड  झाल्याने टाकळी गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून याचे औचित्य साधत सोमवार दि १२ मे रोजी टाकळी ग्रामस्थांच्या वतीने प्रतीक्षाचा नागरी सत्कार केला.

जाहिरात
या प्रसंगी उपस्थित सर्वांनी प्रतिक्षा बाळासाहेब देवकर हिच्या यशाबद्दल भरभरून कौतुक करत तिला भावी वाटचालीस शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले व प्रतिक्षा तिचे वडील बाळासाहेब बाबुराव देवकर व आई अनिता बाळासाहेब देवकर भाऊ शुभम बाळासाहेब देवकर, बहीण रोहिणी रवींद्र आग्रे यांचा शाल, श्रीफळ , हार , पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आहे.  यावेळी प्रतिक्षा हिने या यशमागे माझे आई वडील व परिवार असल्याचे सांगत आपल्या आई वडिलांना मिठाई भरवली आहे.

जाहिरात
या सत्कार कार्यक्रमास कोपरगाव तालुक्यातील विविध मान्यवर,तसेच टाकळी गावातील व पंचक्रोशीतील ग्रामस्थ , मित्र मंडळी आदी प्रमुख मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे