आपला जिल्हा

आ.आशुतोष काळेंच्या प्रयत्नातून पूर्व भागाच्या पाण्याचा प्रश्न मार्गी – कारभारी आगवण

आ.आशुतोष काळेंच्या प्रयत्नातून पूर्व भागाच्या पाण्याचा प्रश्न मार्गी – कारभारी आगवण

पालखेड डाव्या कालव्यातून भरलेल्या पाझर तलावाच्या पाण्याचे कार्यकर्त्यांकडून जलपूजन

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १५ सप्टेंबर २०२५ :-कर्मवीर शंकररावजी काळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतांना कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या दुष्काळाच्या झळा कमी करण्यासाठी अनेक गावात पाझर तलावांची निर्मिती केली.पालखेड डाव्या कालव्याच्या आवर्तनावर अवलंबून असणाऱ्या या पाझर तलावात माजी आमदार अशोकराव काळे यांच्या काळात  हे पाझर तलाव नियमित भरले जात होते. व २०१९ पासून आ. आशुतोष काळे देखील हे तलाव भरून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. त्यामुळे पूर्व भागातील नागरीकांच्या चिंता मिटल्या असून आ. आशुतोष काळेंच्या प्रयत्नातून पूर्व भागाच्या नागरिकांचा व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असल्याचे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवण यांनी केले आहे.

जाहिरात

आ.आशुतोष काळे यांच्या प्रयत्नांतून पालखेड डाव्या कालव्यातून कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शिरसगावसावळगावकासली व उक्कडगाव येथील पाझर तलाव भरून देण्यात आले आहेत. या पाझर तलावांतील पाण्याचे सोमवार (दि.१५) रोजी स्थानिक कार्यकर्त्यांच्या हस्ते जलपूजन’ करण्यात आले याप्रसंगी कारभारी आगवण बोलत होते. ते पुढे म्हणाले की,पावसाळा संपत आला असून पावसाचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे मात्र अवर्षणग्रस्त असलेल्या कोपरगाव तालुक्यात व विशेषत: पूर्व भागात अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. मात्र धरणक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे सर्व धरणे पूर्ण भरलेली आहेत.त्यामुळे या धरणातून गोदावरी डाव्या-उजव्या कालव्यांना व पालखेड डाव्या कालव्याला तसेच एक्सप्रेस कालव्याला ओव्हर फ्लोचे पाणी सोडण्याच्या सूचना आ. आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाला दिल्या आहेत. त्यामुळे सुरु असलेल्या पालखेड कालव्यातून पूर्व भागातील बंधारे पूर्ण क्षमतेने भरले जावून भू-गर्भातील पाणी पातळी वाढण्यास निश्चितपणे मदत होईल व पिकांना देखील फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उक्कडगाव येथील आप्पासाहेब निकम यांनी सांगितले की, आमचे गाव हे तालुक्याच्या सीमेवरचे शेवटचे गाव मात्र आ.आशुतोष काळेंच्या प्रयत्नातून मागील सहा वर्षापासून आमच्या गावातील पाझर तलाव आवर्जून भरून दिले जात आहे. याहीवर्षी पाऊस कमी झाल्यामुळे निर्माण झालेल्या अडचणी आम्ही आ.आशुतोष काळे यांच्याकडे मांडल्या असता त्यांनी त्याचवेळी पाटबंधारे विभागाला सूचना करून पाझर तलाव भरून देण्यास सांगितले होते. तसेच श्री रेणुका माता देवस्थान येथे शाळेच्या विद्यार्थ्यांच्या रस्त्यासाठी चारीवर  सिमेंट पाईप  टाकणे गरजेचे होते. सिमेंट पाईपची अडचण देखील त्यांनी स्व-खर्चातून दूर केली त्यामुळे तो प्रश्न कायमचा मिटला असल्याचे सांगत सर्व गावांतील पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरून दिल्याबद्दल नागरिकांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले.

जाहिरात

यावेळी सांडूभाई पठाणराधु उकिर्डेशिरसगाव-सावळगावचे  सरपंच अशोक उकिर्डेतिळवणीचे सरपंच गोविंद पगारेजिनिंग प्रेसिंगचे मा. व्हा.चेअरमन नानासाहेब निकम, संचालक संदीप शिंदे, गोदावरी खोरेचे संचालक आप्पासाहेब निकमराहुल गायकवाडऋषिकेश भवरअमृत शिंदेकेशव गायकवाडगोकुळ गायकवाडलक्ष्मण भागवतबाळासाहेब भागवतरवी सुबेशांताराम भागवतजलील पटेलगोविंद गायकवाडभिकाजी भागवतसंदीप भागवतसोमनाथ भागवतबाबासाहेब भागवतविनोद भागवतज्ञानदेव भागवतविशाल भागवतचांगदेव भागवतकिशोर गायकवाडरावसाहेब उकिर्डेअनिल वायदेस्करबिलाल शेखतौसिब शहासुलतान पटेलशरद गायकवाडसोमनाथ भागवतअक्षय भागवतउक्कडगाव येथे किसन निकमवाल्मिक निकमश्रीरंग निकमनवनाथ निकमसंदीप निकमजिल्हा बँकेचे तज्ञ संचालक रविंद्र निकमदत्तात्रय निकमरमेश पोटेमेहेश निकमवाल्मिक निकमहिरामण गुंजाळगणेश निकमभानुदास निकमसंदिप निकम आदी उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

One Comment

  1. वर्तमानपत्रात बातम्यांच्या माध्यमातून समाजातील विविध घडामोडी लोकांपर्यंत पोहोचविणारे आणि सोशल मीडियावर ओम साई न्युज -बातमी पत्राच्या माध्यमातून माहितीचे सुजाण व्यासपीठ निर्माण करणारे आदरणीय पत्रकार श्री. विजयजी कापसे सर यांचे मनःपूर्वक अभिनंदन व कौतुक!
    त्यांच्या लेखणीतील सचोटी, संवेदनशीलता व समाजहिताची जाण यामुळे वाचकवर्गाला नेहमीच दिशा मिळते. आपल्या कार्यातून ते खऱ्या अर्थाने पत्रकारितेचे सामाजिक भान जपत आहेत.

    संदीप चव्हाण सर करंजी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे