आपला जिल्हा

चौरंगीनाथ महाराजांच्या यात्रेचा श्रीफळ वाढवून शुभारंभ; सर्वानुमते यात्रा कमिटीची निवड

चौरंगीनाथ महाराजांच्या यात्रेचा श्रीफळ वाढवून शुभारंभ; सर्वानुमते यात्रा कमिटीची निवड

चौरंगीनाथ महाराजांच्या यात्रेचा श्रीफळ वाढवून शुभारंभ; सर्वानुमते यात्रा कमिटीची निवड

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ३० मार्च २०२५कोपरगाव तालुक्यातील करंजी पंचक्रोशीतील सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान जागृत देवस्थान म्हणून सर्व परिचित असलेले श्री चौरंगीनाथ महाराजांच्या यात्रा उत्सवाचा परंपरेनुसार शनिवार दि ३० मार्च रोजी साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या शुभ दिनी गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व धर्मियांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून शुभारंभ करत सर्वांनुमते यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी आशरफभाई इनामदार, उपाध्यक्षपदी योगेश भिंगारे, सचिव पदी योगेश शिंदे, तर उपकार्याध्यक्षपदी सोमनाथ काकडे यांचे एकमताने निवड करण्यात आली.

जाहिरात आत्मा

याप्रसंगी यात्रा कमिटीचे मार्गदर्शक कार्याध्यक्ष तथा तंटामुक्ती समिती अध्यक्ष संतोष भिंगारे, लोकनियुक्त सरपंच रवींद्र आगवन, देविदास भिंगारे, डॉ सुनील देसाई, विकास शिंदे, दादासाहेब भिंगारे, राजू शेख, गणेश भिंगारे, गणेश मच्छिंद्र भिंगारे, अंबादास आगवन, दादासाहेब जोरवेकर, दगुनाना वाघ, अशपाक इनामदार, भैया शेख, सांडभाई पठाण, आकाश भिंगारे, समीर शेख, दगू कापसे, हर्षल आगवन, चंद्रकांत भिंगारे, अशोक कापसे, अण्णासाहेब भिंगारे, अनिल डोखे, गणेश बोठे, जनार्दन बोर्डे, शिवाजी डोखे, मदेखा पठाण, भीमराज कासार, वाल्मीक जोर्वेकर, भास्कर भिंगारे, किशोर शिंदे आदि ग्रामस्थ व यात्रा कमिटीचे सदस्य उपस्थित होते.

जाहिरात

या प्रसंगी उपस्थित जेष्ठ कमिटी सदस्यांनी गेल्या ३० ते ४० वर्षांपासून मोठ्या उत्साहात अक्षय्यतृतीयेच्या दिवशी पारंपारिक खेळ,विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करत गावातील घराघरात जणू दिवाळीचा सणच साजरा होतो या पद्धतीने साजरी होत असलेल्या जागृत देवस्थान आसलेले सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान श्री चांदवलीबाबा चौरंगीनाथ महाराजांच्या यात्रेची महती व स्वरूप सांगत सर्वाना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.

जाहिरात
नवनिर्वाचित यात्रा कमिटी

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे