संगमनेर

अमृतवाहिनी अभियांत्रिकीच्या संगणक विभागातील ५५ विद्यार्थ्याना निकालापूर्वीच नोकरी 

अमृतवाहिनी अभियांत्रिकीच्या संगणक विभागातील ५५ विद्यार्थ्याना निकालापूर्वीच नोकरी 
अमृतवाहिनी अभियांत्रिकीच्या संगणक विभागातील ५५ विद्यार्थ्याना निकालापूर्वीच नोकरी 
जाहिरात

संगमनेर प्रतिनिधी दि ३० मे २०२४अमृतवाहिनी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन उपक्रम राबवले जातात. ह्याच उपक्रमंचा फायदा विद्यार्थ्यांना होत असतो. संगणक विभागातील ५५ विद्यार्थ्यांना विविध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय कंपन्यात नोकरी मिळाली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्याचा विकास हेच संस्थेचे उदिष्ट असते. नोकरी मिळालेल्या आंतरराष्ट्रीय कंपन्या TCS, Persistent, Mahindra Infotech, Godrej Infotech, Netwin, Munro Group,Winjit, Winsoft, SPCL ह्यात विद्यार्थ्यांना संधी मिळाली आहे. नोकरी मिळवण्यासाठी फक्त शैक्षणिक गुणवत्ता महत्वाची नसून विविध कौशल्यहि महत्वाची आहेत. त्यासाठी संगणक विभागात विविध उपक्रम राबवले जातात , ह्या  शैक्षणिक वर्षा पासून संगणक विभागात NetLeap IT चे सेंटर ऑफ एक्सेल्लेंस फॉर फुल स्टेक डेव्ह्लअपर्स व Sumago Infotech चे स्कोप सेंटर स्थापन करण्यात आले. ह्या सेंटर च्या अंतर्गत विविध चर्चासत्र आणि कार्यशाळा आयोजित करण्यात येतात, तसेच  ह्याचा फायदा विद्यार्थाना नोकरी मिळवण्यासाठी होतो.

जाहिरात

तसेच जपान संचालित अंतरराष्ट्रीय कंपनी मध्ये नोकरी मिळवण्यासठी जापनीज भाषा (Japanese Langauge) शिकवण्यात येते. विभागातील २५० विद्यार्थी ह्या भाषेत पारंगत आहेत. तसेच  IBM excellence center , ESDS Cloud Center, Amazon AWS, REDHAT certification, NVIDIA GPU Computing Programming, Microsoft student partner, ISTE Students Chapter, IEEE CSI Student Chapter असे विविध उपक्रम विभागात राबवले जातात. प्रत्येक कंपनी च्या पात्रेतेनुसार प्रशिक्षण , बुद्धिमत्ता प्रशिक्षण , मुलाखत प्रशिक्षण देण्यात येते.  विभागात प्रत्येक आठवड्याला वादविवाद , चर्चा सत्र , निबंध स्पर्धा , क्वीज कॉम्पेतिशन, वकृत्वस्पर्धा  आयोजित करण्यात येते. विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमां व्यतिरिक्त कंपनीतील काम शैली माहित असावी म्हणून प्रत्येक सत्रात १ कंपनीला भेट दिली जाते. ह्यातून विद्यार्थ्याना कामशैली माहित होते. विविध प्रकारचे विषय तज्ञांचे व्याख्यान व कार्यशाळा यांचे आयोजन केले जाते .

जाहिरात
विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळाल्याबद्दल  संस्थेचे अध्यक्ष राज्याचे माजी  महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात , विश्वस्त डॉ. सुधीरजी तांबे , विश्वस्त शरयूताई देशमुख , कार्यकारी अधिकारी  अनिल शिंदे ,डायरेक्टर ॲकेडमिक्स डॉ. जे.बी. गुरव,  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. ए . वेंकटेश , रजिस्ट्रार प्रा. वि. पी. वाघे , विभाग प्रमुख डॉ. एस.के.सोनकर  यांनी अभिनंदन केले.

जाहिरात

 

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे