संवत्सर गावात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी.
संवत्सर गावात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
संवत्सर गावात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी.

संवत्सर विजय कापसे दि २० फेब्रुवारी २०२५: कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले मागासवर्गीय वाचनालय मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ व्या जयंती निमित्ताने प्रतिमा पूजन करण्यात आले यावेळी लक्ष्मण साबळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले तर लक्ष्मण परजणे यांनी डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले यावेळी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे माजी संचालक फकीरराव बोरनारे, औद्योगिक वसाहती संचालक सोमनाथ पाटील निरगुडे पेन्शनर संघटना अध्यक्ष दिलीपराव ढेपले, लक्ष्मण परजणे, शिवाजीराव गायकवाड ,अशोक लोहकणे, पंकज चंदनशिव, करपे पाटील आणि गायकवाड बाबा दत्तु कांबळे,दिपक कांबळे आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी साबळे यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर माहिती दिली. वाचनालयाचे अध्यक्ष पंडित भारुड सर यांनी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करून प्रास्ताविक व शेवटी आभार मानले.






