आपला जिल्हा

भारुड यांचे  स्वलिखित  “तुला मी माझी म्हणून स्विकारले” मराठी लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

 भारुड यांचे  स्वलिखित  “तुला मी माझी म्हणून स्विकारले” मराठी लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

भारुड यांचे  स्वलिखित  “तुला मी माझी म्हणून स्विकारले” मराठी लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

जाहिरात आत्मा

कोपरगाव विजय कापसे दि २० फेब्रुवारी २०२५कोपरगाव तालुक्यातील संवत्सर भिमवाडी येथील सुप्रसिध्द व्यक्तिमत्व पंडित भारुड सर यांचे नुकतेच स्वलिखित मराठी गीत “तुला मी माझी म्हणून स्विकारले” हे प्रेम गीत नुकतेच श्रीरामपूर येथील स्टुडिओत तसेच सुमधुर संगीत व गोड आवाजात जेष्ठ गायक विकासराव साळवे यांनी गायले आहे.ते थोड्याच दिवसात सर्वांना वेगवेगळ्या माध्यमातून ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी उपलब्ध होणार असल्याचे निर्मिती करणारे व गितकार पंडित भारुड सर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

जाहिरात

भारूड सर यांनी आजपर्यंत गंडेतोडे, क्रांतिसुर्या, लाव्हा, प्रिंटेड सर्किट बोर्ड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक योगदान व्याख्यान सीडी, तसेच कै.माजी मंत्री शंकररावजी कोल्हे यांच्या जीवनावर आधारित डॉक्युमेंटरी फिल्म विजयी गाथा व त्यातील संपूर्ण स्क्रिप्ट गाणे पोवाडे भारुड यांनी लिहिलेले असुन त्यांच्या गंडतोडे कादंबरीवरील चित्रपटांसाठी पाच गाणे व एक लावणी तसेच पटकथा संवाद निर्मिती झालेली आहे. त्याचेही चित्रीकरण होणार आहे.

जाहिरात

भारुड सर यांच्या नवीन मराठी गाण्याच्या निर्मिती बद्दल पहिल्या महिला आमदार स्नेहलता बिपिनदादा कोल्हे, संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजचे विश्वस्त नितीनदादा कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे चेअरमन विवेकभैया कोल्हे तसेच कार्यकारी विश्वस्त अमितदादा कोल्हे तसेच माजी जि.प. सदस्य राजेश परजणे, सरपंच सुलोचना ढेपले संचालक ज्ञानदेव  परजणे ,उपसरपंच विवेक परजणे, संचालक बापूसाहेब बारहाते, दिलीपराव बोरनारे, मधुकर साबळे, माजी जि.प सदस्य संपतराव भारुड,दिपकराव गायकवाड आदिनी भारुड यांना त्यांच्या नवीन निर्मिती गीताबदल शुभेच्छा दिल्या.

जाहिरात

त्यांच्या या लेखन कार्याबद्दल राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार असे अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे