आपला जिल्हा

गुणवंतांचा गौरव, ज्येष्ठांचा सन्मान; ब्राह्मण सभेचा सोहळा उत्साहात

गुणवंतांचा गौरव, ज्येष्ठांचा सन्मान; ब्राह्मण सभेचा सोहळा उत्साहात

गुणवंत विद्यार्थी, शिक्षक व मान्यवरांचा सन्मान; बाजीराव पेशव्यांच्या जीवनावर अभ्यासपूर्ण व्याख्यान

Kopargaon vijay kapse दि ३१ ऑगस्ट २०२६: गुणवंतांच्या कर्तृत्वाला दाद, ज्येष्ठांच्या योगदानाचा गौरव आणि नव्या पिढीला इतिहासातून प्रेरणा देण्याच्या उद्देशाने ब्राह्मण सभा, कोपरगावच्या वतीने आयोजित ‘गुणगौरव, ब्रह्मजीवन गौरव, ब्रह्मगौरव व शिक्षक सन्मान सोहळा-२०२६’ उत्साहात पार पडला.

जाहिरात

माजी नगराध्यक्षा सौ. ऐश्वर्यलक्ष्मी सातभाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास विधानपरिषद सदस्य तथा आमदार विवेकभैय्या कोल्हे, नगराध्यक्ष पराग संधान, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक प्रसाद नाईक, ज्येष्ठ विधिज्ञ जयंतराव जोशी, नाशिक येथील अॅड. समीर जोशी, प्रविण कुलकर्णी, ब्राह्मण एकता मंचचे वैभव पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ब्राह्मण सभा अध्यक्ष मकरंद को-हाळकर यांनी केले. ब्राह्मण सभेच्या स्थापनेपासून सुरू असलेल्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांचा आढावा घेत त्यांनी गुणवंतांचा गौरव हा पुढील पिढीला प्रेरणा देणारा उपक्रम असल्याचे सांगितले.

जाहिरात

गुणवंतांच्या कर्तृत्वातून समाजाची प्रगती : आ.विवेक कोल्हे

आमदार विवेकभैय्या कोल्हे म्हणाले की, गुणवंत विद्यार्थी, शिक्षक आणि कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान हा केवळ कौतुकाचा विषय नसून त्यांच्या कार्याची दखल घेऊन इतरांना प्रेरणा देणारा उपक्रम आहे. शिक्षण, संस्कार आणि गुणवत्तेला प्रोत्साहन देत समाजाने एकजुटीने पुढे जाण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

जाहिरात

ज्येष्ठांच्या अनुभवाचा वारसा नव्या पिढीने पुढे न्यावा : प्रसाद नाईक

प्रसाद नाईक यांनी ज्येष्ठांनी समाजासाठी केलेल्या कार्याचा गौरव करणे ही सामाजिक जबाबदारी असल्याचे नमूद केले. ज्येष्ठांच्या अनुभवातून आणि गुणवंतांच्या कर्तृत्वातून नव्या पिढीने प्रेरणा घेऊन समाजाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

जाहिरात

‘अपराजित योद्धा श्रीमंत बाजीराव पेशवे’वर प्रभावी व्याख्यान

कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते नाशिक येथील व्याख्यात्या सौ. स्नेहल सारंग यांचे ‘अपराजित योद्धा श्रीमंत बाजीराव पेशवे’ या विषयावरील अभ्यासपूर्ण व्याख्यान. बाजीराव पेशव्यांचे शौर्य, नेतृत्व, दूरदृष्टी, संघर्ष आणि राष्ट्रकार्य यांचा जीवनपट त्यांनी प्रभावीपणे मांडला. ओजस्वी शैलीतील विवेचनातून विशेषतः युवकांना इतिहासातून प्रेरणा घेण्याचा संदेश मिळाला.

विनायकराव रसाळ यांचा ब्रह्मजीवन गौरव

ब्राह्मण सभेच्या स्थापनेपासून संस्थेच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे संस्थापक सचिव विनायकराव रसाळ यांचा ‘ब्रह्मजीवन गौरव’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना ‘ब्रह्मगौरव’, गुणवंत विद्यार्थ्यांना ‘गुणगौरव’, तर शिक्षकांना ‘शिक्षक सन्मान’ प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयेश बडवे यांनी केले, तर उपाध्यक्ष बी. डी. कुलकर्णी यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष मकरंद को-हाळकर, उपाध्यक्ष बाळकृष्ण कुलकर्णी, सचिव सचिन महाजन, सहसचिव संदीप देशपांडे, संघटक महेंद्र कुलकर्णी, गौरीष लव्हरीकर, खजिनदार जयेश बडवे, सहखजिनदार योगेश कुलकर्णी यांच्यासह कार्यकारिणी सदस्यांनी परिश्रम घेतले.

गुणवंतांचा गौरव, ज्येष्ठांच्या कार्याचा सन्मान आणि इतिहासातून नव्या पिढीला प्रेरणा देणारे विचार यांचा सुंदर संगम या सोहळ्यात घडून आल्याने कार्यक्रम समाजासाठी प्रेरणादायी व संस्मरणीय ठरला.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे