आपला जिल्हा

ताराराणी मल्टी ट्रेड च्या वतीने पोहेगाव मध्ये मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षण- रोहमारे

ताराराणी मल्टी ट्रेड च्या वतीने पोहेगाव मध्ये मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षण- रोहमारे

ओबीसी,एससी व एसटी या प्रवर्गातील मुलींनी या संधीचा लाभ घ्यावा
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २७ एप्रिल २०२४–  कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील ताराराणी मल्टी ट्रेड अँड सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीने कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव व परिसरातील ओबीसी,एससी व एसटी या प्रवर्गातील मुलींसाठी मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षण सुरू करण्यात आले असल्याची माहिती कंपनीच्या सर्वेसर्वा जयश्री रोहमारे यांनी दिली आहे.

जाहिरात
कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील ताराराणी मल्टी ट्रेड अँड सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या जयश्री रोहमारे यांनी याविषयी अधिक माहिती देताना सांगितले की, सध्या उन्हाळ्याचे दिवस असून या उन्हाळ्याच्या सुट्टीचा महाविद्यालय विद्यार्थिनींना सदुपयोग व्हावा या उद्देशाने कंपनीच्या सोशल फंड्स मधून ओबीसी एससी व एसटी प्रवर्गातील मुलींसाठी परिपूर्ण ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण देणारा कोर्स अगदी मोफत शिकवला जाणार आहे.तसेच शासनाकडून व्यवसाय उभारणीसाठी पस्तीस टक्के सबसिडीचे कर्ज कसे मिळवायचे याकरता परिपूर्ण मार्गदर्शन केले जाणार आहे त्यामुळे परिसरातील ओबीसी एससी व एसटी प्रवर्गातील गरुजू मुलीनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन ताराराणी मल्टी ट्रेड अँड सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सर्वेसर्वा जयश्री रोहमारे यांनी केले आहे.

जाहिरात
जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे