आपला जिल्हा

अमृतवाहिनी अभियांत्रिकीमध्ये प्रथमवर्ष प्रवेश सुविधा व मार्गदर्शन केंद्र सुरु

अमृतवाहिनी अभियांत्रिकीमध्ये प्रथमवर्ष प्रवेश सुविधा  मार्गदर्शन केंद्र सुरु

अमृतवाहिनी अभियांत्रिकीमध्ये प्रथमवर्ष प्रवेश सुविधा  मार्गदर्शन केंद्र सुरु

जाहिरात

संगमनेर विजय कापसे दि २७ जुन २०२५पालक व विद्यार्थ्यांची प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या प्रवेशाची प्रतीक्षा संपली असून नुकतेच तंत्रशिक्षण संचालनालयाने सर्व व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम यांचे वेळापत्रक जाहीर केले आहेत. दिनांक २८ जून २०२५ पासून प्रथम वर्ष अभियांत्रिकी आणि एमबीए प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहेत. याकरिता यापूर्वीच अमृतवाहिनी महाविद्यालयाने मार्गदर्शन केंद्र सुरू करून आत्तापर्यंत एक हजाराच्या वर विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रिया केंद्रास प्रत्यक्ष भेट देऊन प्राध्यापकाकडून समुपदेशनाद्वारे विद्यार्थी व पालकांच्या शंकांचे समाधान करण्यात आले आहे. महाविद्यालयाने सोशल मीडियाद्वारे सर्व महत्त्वाचे संदेश पालकांपर्यंत पोहोचवण्याची यशस्वी यंत्रणा राबवली आहे. प्रवेश प्रक्रिया जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी व पालक यांनी सर्व प्रक्रिया अगदी सुरळीतपणे व विनाशंका पूर्ण करावी असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम ए व्यंकटेश यांनी केले आहे.

जाहिरात

डॉ. एम ए वेंकटेश म्हणाले की नुकतेच महाविद्यालयास ऑटोनॉमस दर्जा म्हणजेच स्वायत्त दर्जा प्राप्त झालेला असून यावर्षीपासून प्रथम वर्ष विद्यार्थ्यांना अमृतवाहिनी मध्ये प्रवेश घ्यावयाचा असल्यास ऑप्शन फॉर्म भरताना ऑटोनॉमस या टॅबमधून महाविद्यालय निवडावयाचे आहे. मागील तीन वर्षात एकूण २१५५ प्लेसमेंट व यावर्षी सर्व विभागातील आतापर्यंत ६३० प्लेसमेंट झालेल्या आहेत. उच्चविदयाविभूषित व अनुभवी प्राध्यापक, ४२ वर्षांची उत्कृष्ट शैक्षणिक संस्कृती यामुळे विद्यार्थी व पालक दरवर्षी अमृतवाहिनी अभियांत्रिकीस पसंती देत आहेत. महाविद्यालयातील जपानी व जर्मन भाषा केंद्राने विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. याबरोबरच या वर्षापासून अभ्यासक्रमातही जपानी व जर्मन भाषेचा अंतर्भाव केल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर करिअरच्या संधी वाढणार आहेत. प्रकल्प स्पर्धा, प्रकल्पावर आधारित शिक्षण यामुळे विद्यार्थ्यांचे कौशल्य विकसित होऊन प्लेसमेंट होण्यास मदत होत आहे.

जाहिरात

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी १९८३ यावर्षी सुरू केलेल्या महाविद्यालयाने संगमनेरच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री बाळासाहेब थोरात व विश्वस्त डॉ. सुधीरजी तांबे यांच्या मार्गदर्शनाने गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना मिळत असल्याचे समाधान आहे. महाविद्यालयातील अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया तसेच करियर मार्गदर्शनासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद आपला वेळ देत असून यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दरवर्षी मदत होत आहे. “मुलींचे व्यावसायिक शिक्षण हे मोफत झाले असून यामुळे मुलींचा ओढा व्यवसायिक शिक्षणाकडे वाढत आहे, सर्व मुलींनी याचा लाभ घ्यावा” असे आवाहन अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या व्यवस्थापकीय विश्वस्त शरयूताई देशमुख आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी महाविद्यालयाचे रजिस्ट्रार व्ही. पी.  वाघे, प्रथम वर्ष प्रवेश समन्वयक डॉ. व्ही. जे. हासे आणि सर्व विभाग प्रमुख यांचेशी संपर्क करावा.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे