आपला जिल्हा
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेस बँकटेक अवॉर्ड
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेस बँकटेक अवॉर्ड
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेस बँकटेक अवॉर्ड

या व्यतिरिक्त या बँकेस एनपीएच्या उत्कृष्ट व्यवस्थापनाबद्दल बिंग अवॉर्ड हा पुरस्कार तर सर्व कर्मचाऱ्यांना वारंवार दिलेल्या प्रशिक्षणा बद्दल बिट्स अवॉर्ड हा पुरस्कार देखील प्राप्त झाला.
यावेळी बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श शिस्तीवर लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी सहकारी बँकेने गेल्या वर्षभरामध्ये बँकेमध्ये खूप चांगले तांत्रिक बदल केलेले आहे. यामध्ये डिजिटल पेमेंट, एटीएम, क्यू आर कोड तसेच वसुली करीता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर इत्यादी बदल यशस्वीरित्या केलेले आहेत. बँकेने नेट एनपीए शून्य टक्के राखण्यात यश मिळवलेले आहे. बँकिंग क्षेत्रामध्ये येणाऱ्या बदलास सामोरे जाण्याच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांना वारंवार वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण बँकेतर्फे देण्यात येत आहेत. या सर्व गोष्टींमुळेच बँकेचा व्यवसाय १०८० कोटी रुपयांपर्यंत पोहोचलेला आहे.

तर नानासाहेब शिंदे म्हणाले की, जिल्ह्यात व राज्यात बँकिंग क्षेत्रामध्ये अमृतवाहिनी बँकेने मोठा नावलौकिक निर्माण केला आहे.
बँकेला मिळालेल्या पुरस्काराबद्दल मार्गदर्शक माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात मा.आमदार डॉ.सुधीर तांबे,आमदार सत्यजित