आपला जिल्हा

धनगर समाज आरक्षणसाठी राज्यस्तरीय आंदोलन उभारणार- दीपक बोऱ्हाडे

धनगर समाज आरक्षणसाठी राज्यस्तरीय आंदोलन उभारणार- दीपक बोऱ्हाडे

धनगर समाज आरक्षणसाठी राज्यस्तरीय आंदोलन उभारणार- दीपक बोऱ्हाडे

जाहिरात

शिर्डी विजय कापसे दि १३ फेब्रुवारी २०२६धनगर समाजाला अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष आता पुन्हा तीव्र होणार आहे. गेल्या वर्षी मुंबईतील आझाद मैदानावर झालेल्या मोठ्या आंदोलनानंतर पुन्हा एकदा राज्यस्तरीय आंदोलन उभारण्याचा निर्णय आज शिर्डीत झालेल्या धनगर समाजाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

जाहिरात

शिर्डी जवळील साई पालखी निवारा येथे आज पार पडलेल्या या राज्यस्तरीय नियोजन बैठकीत राज्यभरातील धनगर समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी सरकारवर दबाव वाढवण्याची रणनीती ठरवण्यात आली. धनगर समाजाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनात्मक तरतुदीनुसार अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळायला हवे असा समाजाचा ठाम दावा आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक वर्षांपासून हा विषय प्रलंबित असून केवळ आश्वासनांवरच समाधान मानावे लागत असल्याची भावना या बैठकीत व्यक्त करण्यात आली.

जाहिरात

गेल्या काही वर्षांत विविध समित्या, अहवाल आणि राजकीय आश्वासनांनंतरही ठोस निर्णय न झाल्यामुळे समाजामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे आता शांत मार्गाने मागणी करूनही न्याय मिळत नसेल, तर पुन्हा एकदा व्यापक आणि तीव्र आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचा सूर या बैठकीत उमटला. सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने तसेच ऊस तोडणीचा हंगाम सुरू असल्यामुळे आंदोलनाची तारीख तात्काळ जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र परीक्षा आणि ऊस तोड हंगाम संपल्यानंतर मुंबईतील आझाद मैदानावर पुन्हा एकदा लाखोंच्या उपस्थितीत भव्य आंदोलन छेडण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.
ही बैठक दीपक बोऱ्हाडे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, धनगर समाजाचा एसटी आरक्षणाचा प्रश्न हा केवळ सामाजिक नाही तर तो न्याय आणि घटनात्मक हक्कांचा प्रश्न आहे. सरकारने या मागणीवर तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असा इशाराही त्यांनी दिला.

जाहिरात

या बैठकीत पुढील आंदोलनासाठी नियोजन समित्या स्थापन करणे, राज्यभर जनजागृती मोहिमा राबवणे, तसेच विविध जिल्ह्यांमध्ये तयारी बैठका घेण्याचा निर्णयही घेण्यात आला. येत्या काळात धनगर समाज संघटितपणे रस्त्यावर उतरणार असल्याचे स्पष्ट संकेत धनगर एस टीआरक्षण संघर्ष योद्धा दिपक बोऱ्हाडे यांनी दिला आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे