आपला जिल्हा

मतदान केंद्र असलेल्या शाळांना १ व २ डिसेंबर रोजी सुट्टी जाहीर

मतदान केंद्र असलेल्या शाळांना १ व २ डिसेंबर रोजी सुट्टी जाहीर

मतदान केंद्र असलेल्या शाळांना १ व २ डिसेंबर रोजी सुट्टी जाहीर

जाहिरात

अहिल्यानगर प्रतिनिधी दि २७ नोव्हेंबर २०२५नगर परिषद व नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका २०२५ अनुषंगाने जिल्ह्यातील ११ नगर परिषद व एका नगरपंचायतीमध्ये दि.२ डिसेंबर रोजी मतदान तर ३ डिसेंबर २०२५ रोजी मतमोजणी होणार आहे. मतदान केंद्र म्हणून नियुक्त सर्व शाळांना दि. १ व २ डिसेंबर २०२५ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (भा.प्र.से.) यांनी काढले आहेत.

जाहिरात

जिल्ह्यातील संगमनेर, कोपरगाव, शिर्डी, राहाता, राहुरी, देवळाली प्रवरा, श्रीरामपूर, पाथर्डी, शेवगाव, जामखेड व श्रीगोंदा नगरपरिषद तसेच नेवासा नगरपंचायत मतदानाच्या पूर्वतयारीसाठी अधिकारी व कर्मचारी दि.१ डिसेंबर रोजीच मतदान केंद्रांवर दाखल होणार असल्याने संबंधित शाळा उपलब्ध ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे दि.१ डिसेंबर रोजी व दि.२ डिसेंबर २०२५ मतदानाच्या दिवशी ह्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

जाहिरात

निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी ही सुट्टी घोषित करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे