आपला जिल्हा

भाऊसाहेब संतूजी थोरात महाविद्यालयात ७ दिवसीय स्किल डेव्हलोपमेंट कार्यक्रम

भाऊसाहेब संतूजी थोरात महाविद्यालयात ७ दिवसीय स्किल डेव्हलोपमेंट कार्यक्रम
भाऊसाहेब संतूजी थोरात महाविद्यालयात ७ दिवसीय स्किल डेव्हलोपमेंट कार्यक्रम
संगमनेर विजय कापसे दि ११ मार्च २०२६भाऊसाहेब संतूजी थोरात महाविद्यालय, संगमनेर येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ७ दिवसीय  (दि 9/3/2026 ते 15/3/2026)    स्किल डेव्हलोपमेंट प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.

जाहिरात

या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी माहेश्वरी म्हैसागर व विनोद गायकवाड हे प्रशिक्षक मार्गदर्शन करणार आहेत. विद्यार्थ्यांना रोजगारक्षम कौशल्ये विकसित करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

जाहिरात

या कार्यक्रमासाठी प्रकल्प प्रमुख म्हणून ज्योती वाघचौरे यांनी नियोजन केले असून महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. बाळासाहेब वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. एल. डी. घायवट यांनीही कार्यक्रमासाठी सहकार्य केले.

जाहिरात

या कार्यक्रमाचे आयोजन समिती प्रमुख प्रा. गणेश थोरात यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी समिती सदस्य प्रा. नवनाथ नागरे, मिनेश सातपुते, प्रा. महेश हजारे, कोमल म्हस्के, स्वाती ढोले, अक्षय कुमकर, कोमल गायकवाड व संदीप कुदनर उपस्थित होते.

जाहिरात

सदर प्रशिक्षण कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संवाद कौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास, करिअर मार्गदर्शन आणि रोजगारासाठी आवश्यक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासाला चालना मिळून त्यांना भविष्यातील करिअरसाठी मार्गदर्शन मिळणार आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे