हायड्रोफेशियल कार्यशाळेचे शिर्डीमध्ये लवकरच आयोजन- जयश्री रोहमारे
हायड्रोफेशियल कार्यशाळेचे शिर्डीमध्ये लवकरच आयोजन- जयश्री रोहमारे
हायड्रोफेशियल कार्यशाळेचे शिर्डीमध्ये लवकरच आयोजन- जयश्री रोहमारे

शिर्डी विजय कापसे दि १२ एप्रिल २०२४– महाराष्ट्र शासन व ताराराणी मल्टीट्रेड अँड सर्विसेस यांच्या संयुक्त विद्यमानाने शिर्डी येथे लवकरच हायड्रोफेशियल या आधुनिक तंत्रज्ञान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती ताराराणी मल्टीट्रेडच्या संचालिका जयश्री रोहमारे यांनी दिली आहे.

ताराराणी मल्टीट्रेडच्या संचालिका जयश्री रोहमारे यांनी याविषयी अधिक माहिती देताना सांगितले की, आयोजित केलेल्या या हायड्रोफेशियल तंत्रज्ञान कार्यशाळेत हायड्रोफेशियल, हायड्रोड्राइमंड वॉटर, ड्रायडायमंड फिलिंग, ऑक्सिजन स्प्रे , अल्ट्रासाउंड, आर एफ फॉर टायटनिंग, स्किन स्क्रबर, कूलिंग प्रो, एलईडी फेस मास्क, रोटरी मेसेंजर आदी क्रियावर या आधुनिक तंत्रज्ञान कार्यशाळेत मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टरांकडून मार्गदर्शन केले जाणार असून त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील स्किन केअर या विषयात काम करणाऱ्या सर्व ब्युटीशियन महिलांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन जयश्री रोहमारे यांनी केले.

तरी जास्तीत जास्त इच्छुक महिलांनी ९०११ ४४७१ ९० व ८८८८ ४२९१ ७१ या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून नाव नोंदणी करावी असे आवाहन ताराराणीचे भाऊसाहेब वाघ यांनी केले आहे.




