आपला जिल्हा

संत जनार्दन स्वामी मंदिराजवळ भीषण अपघात; एक ठार, एक गंभीर जखमी

 संत जनार्दन स्वामी मंदिराजवळ भीषण अपघात; एक ठार, एक गंभीर जखमी

पुणतांबा फाटा ते गोदावरी नदी मोठा पूल रस्ता बनला मृत्यूचा साफळा

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ११ मे २०२५: कोपरगाव शहरात हद्दीतील  नगर-मनमाड महामार्गावरील संत जनार्दन स्वामी मंदिराजवळ आज ११ मे २०२५ रविवार दुपारी कंटेनर आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात एक तरुण जागीच ठार झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे.

जाहिरात

मृत युवकाचे नाव हाफिस रफिक शहा (वय ३४ रा. येवला) असे असून, शिवाजी अर्जुन थोरात (वय ५३, रा. रुई, ता. राहाता) हे गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर संत जनार्दन स्वामी हॉस्पिटल  कोकमठाण कोपरगाव येथे उपचार सुरू आहेत.

जाहिरात

अपघातानंतर मयत तरुणाचा मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले असून घटनेनंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून, वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे