करंजी ग्रामपंचायतीच्या वतीने प्रेरणा दिन साजरा करत स्व.कोल्हे यांना अभिवादन
करंजी ग्रामपंचायतीच्या वतीने प्रेरणा दिन साजरा करत स्व.कोल्हे यांना अभिवादन
गावातील दिव्यांगांना केले किराणा किटचे वाटप

कोपरगाव विजय कापसे दि २५ मार्च २०२५– कोपरगाव तालुक्याचे भाग्य विधाते माजी मंत्री सहकारमहर्षी स्व.शंकरराव कोल्हे यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी केलेल्या अथांग कार्याची प्रेरणा आजच्या युवा पिढीला मिळावी या उद्देशाने कोपरगाव तालुक्यातील करंजी ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचा प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन प्रेरणा दिन साजरा करत गावातील ३६ दिव्यांगांना किराणा किटचे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी गावचे लोकनियुक्त सरपंच रविंद्र आगवन, उपसरपंच शिवाजी जाधव, माजी सभापती नवनाथ आगवन, अमृत संजीवनीचे संचालक देविदास भिंगारे, अरुण भिंगारे, गोरख भिंगारे, रघुनाथ भिंगारे, डॉ सुनील देसाई, गणेश भिंगारे, अजय भिंगारे, लक्ष्मण शेळके, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ फापाळे, बाबासाहेब आगवन, साईनाथ भिंगारे, बाबासाहेब भिंगारे, सुभाष चरमळ, रुपाली जाधव, नानासाहेब डोखे, शंकर आहेर, पूजा डोखे,रुक्मिणी गायकवाड, ग्रामपंचायत अधिकारी सुनील राजपूत आदी सह आजी माजी सदस्य ग्रामस्थ, ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी लोकनियुक्त सरपंच रविंद्र आगवन यांनी माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांना अभिवादन करतांना सांगितले की, माजी मंत्री कोल्हे यांचे कार्य अथांग सागराप्रमाणे असून शेतकऱ्यांसाठी रिझर्व्ह बँकेवर मोर्चा नेणारे ते पहिले शेतकरी सत्याग्रही आंदोलक होते तसेच त्यांनी सुरू केलेल्या शिक्षण संस्थेमधून लाखो विद्यार्थी जगाच्या कानाकोपऱ्यात आपले नाव उंचावत असून साहेबांनी केलेलं कार्य सदैव सर्वांच्या स्मरणात राहील असे बोलून आदरांजली व्यक्त केली.









