आपला जिल्हा

पोहेगाव नागरी पतसंस्थेला २ कोटी ६४ लाख १५ हजार रुपये नफा तर ठेवींची २२५ कोटी कडे वाटचाल -नितीनराव औताडे

पोहेगाव नागरी पतसंस्थेला २ कोटी ६४ लाख १५ हजार रुपये नफा तर ठेवींची २२५ कोटी कडे वाटचाल -नितीनराव औताडे
पोहेगाव नागरी पतसंस्थेला २ कोटी ६४ लाख १५ हजार रुपये नफा तर ठेवींची २२५ कोटी कडे वाटचाल -नितीनराव औताडे
जाहिरात

Kopargaon vijay kapse दि ५ एप्रिल २०२६आहील्यानगर जिल्यातील पतसंस्था चळवळीत आघाडीवर असलेल्या पोहेगाव नागरी पतसंस्थेने नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात विविध ग्राहकाभिमुख सेवांच्या जोरावर वर्षभरात तब्बल  २ कोटी ६४ लाख १५  हजार २७५ रुपये नफा मिळवला. ग्राहक सेवेस केंद्रस्थानी ठेवून केलेल्या पारदर्शक व्यवहारामुळे ठेवीदारांचा विश्वास संपादन करीत ठेवींमध्ये ३७ कोटी ९७ लाख १४ हजार ४४० रु.वाढ झालेली असुन मागील वर्षाच्या तुलनेत२१ टक्क्यांनी ठेविंमध्ये वाढ झालेली आहे.३१ मार्च अखेर संस्थेकडे२१७ कोटी २९ लाख २० हजार ४० रूपये इतक्या ठेवी असून. ठेवीदारांना मधील वाढत्या विश्वसनीयते मुळे ठेवीमध्ये सातत्यानेवाढ होत असल्याने संस्था पुढील काही दिवसात २२५ कोटीचा टप्पा पार करेल असा विश्वास पोहेगांव नागरी पतसंस्थेचे संस्थापक शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांनी व्यक्त केला.

जाहिरात
 संस्थेच्या ३१  मार्च २०२६ अखेरच्या आर्थिक स्थितीची माहिती देताना संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब औताडे यांनी सांगितले की संस्थेची वार्षिक उलाढाल १५२२ कोटी १७  लाख २९ हजार ६०७ रूपये  इतकी आहे, एकूण कर्ज वाटप १३३  कोटी ४५लाख ७  हजार ७५२ रुपये, भाग भांडवल १ कोटी ७३ लाख  ७३३ रुपये, संस्थेची ११६ कोटी १९ लाख ९९  हजार ७५६ रुपये गुंतवणूक आहे तर संस्थेची स्थावर मालमत्ता २ कोटी ९२ लाख ५१ हजार १५५ इतकी असल्याचे त्यांनी सांगितले.

जाहिरात
    संस्थेचा सीडी रेशो चे ६१.४१  टक्के आहे.संस्थेची थकबाकी फक्त१.८९ %असुन एन पी ए ०%राखण्यात संस्थेला यश मिळालेले आहे. संस्थेत उपलब्ध असलेल्या कोअर बँकिंग सुविधेमुळे ग्राहकांना आर्थिक व्यवहारात सुलभता व तत्परता निर्माण झालेली आहे .संस्थेचा प्रगतीचा आलेख संस्थेचे संस्थापक नितिनराव औताडे,संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब औताडे ,उपाध्यक्ष विलासराव रत्ने  संचालक रमेश झांबरे, रियाज शेख, प्रशांत रोहमारे, प्रमोद भालेराव, अर्जुन पवार,अरूण डोखे, सोमनाथ सोनवणे, संस्थेचे मुख्य व्यवस्थापक सुभाष औताडे, पोहेगांव शाखेचे व्यवस्थापक विठ्ठल घारे, शिर्डी शाखेचे व्यवस्थापक सोमनाथ मोजड, कोपरगाव शाखेचे व्यवस्थापक  कोल्हे , वसुली अधिकारी मारूती निभोंरे, धर्मा जावळे,सभासद,ठेविदार, कर्मचारी व कलेक्शन प्रतिनिधी यांच्या सर्वांच्या सहकार्याने वाढतच चाललेला आहे. ग्राहकांच्या सेवेसाठी संस्थेने सुसज्ज अशी कोपरगाव शाखेसाठी इमारत उपलब्ध करून दिली आहे. अत्याधुनिक सेवा ,स्ट्राँग रूम ,वीज बिल भरणा केंद्र ,आरटीजीएस ,एनएफटी सोनेतारण कर्ज अदि सुविधा मुळे व पारदर्शक व्यवहारामुळे ठेवीमध्ये वाढ होत आहे.

जाहिरात
संस्थेच्या पोहेगाव, कोपरगाव, शिर्डी परिसरातील शाखांमार्फत व्यवसाय वाढवणे ,बाजारपेठेला हातभार लागावा व बेरोजगारांना रोजगार मिळावा या हेतूने संस्थेच्या शाखेमार्फत कर्ज वितरण करण्यात येते संस्थेचे कर्जवाटप व वसुली यापुरतेच कार्य मर्यादित नसून संस्था सामाजिक बांधिलकी जोपासत असताना मोफत सर्वरोग निदान शिबीर, मोतीबिंदू शिबीर व विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासत असल्याची माहितीही नितीनराव औताडे यांनी दिली.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे