साई शक्ती इंग्लिश मिडीयम मध्ये ७९ वा स्वतंत्र दिन उत्साहात साजरा
साई शक्ती इंग्लिश मिडीयम मध्ये ७९ वा स्वतंत्र दिन उत्साहात साजरा
साई शक्ती इंग्लिश मिडीयम मध्ये ७९ वा स्वतंत्र दिन उत्साहात साजरा

कोपरगाव विजय कापसे दि १५ ऑगस्ट २०२५– कोपरगाव तालुक्यातील ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेचे कासली येथील साई शक्ती इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये भारतीय स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट निमित्त झेंडावंदन करत ७९ वा स्वतंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या प्रसंगी ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ परशराम साबळे, संस्थेच्या सचिव सुचित्रा साबळे,कमलाताई बाळासाहेब सतभाई तांत्रिक ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य विशाल धारणगावकर, निलेश देवकर, लताबाई आगवन, रामनाथ पगार,प्रकाश शिंदे, नितीन शिंदे, राहुल शिंदे ,अमोल शिंदे, सुभाष शिंदे, भीमा ढेपले, गणेश शिंदे ,कालिदास शिंदे, योगेश पाठक,गोविंद शिंदे, संपत मलिक, नारायण तीपायले, अरुण वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.

तर या प्रसंगी शाळेच्या ध्रुव शिंदे, राघव शिंदे, कविष शिंदे, शिवांश मलिक, प्रणव ढेपले, श्याम नेहे, कृष्णा शिंदे, प्रणवि तीपायले, आराध्या शिंदे, सर्वेश्वरी शिंदे, धनश्री पगार, शिवन्या वाघमारे, पूर्वी शिंदे, शिवन्या शिंदे, यश शिंदे, शिवाजी शिंदे, आदित्य भालेराव, आयुष पाठक आदी विद्यार्थ्यांनी मराठी हिंदी इंग्लिश मध्ये भाषण करत उपस्थित मान्यवरांची मने जिंकली.

या प्रसंगी संस्थेचे संस्थापक डॉ साबळे यांच्या सह उपस्थित अनेक मान्यवरांनी विद्यार्थ्यांना १५ ऑगस्ट च्या शुभेच्छा दिल्या तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य विजय जाधव, संपदा चरमळ, आयुब शेख आदींनी परिश्रम घेतले.




