विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक-महाविद्यालय समन्वय महत्त्वाचा – डॉ. बी. एम. लोंढे

– डॉ. बी. एम. लोंढे
विद्यार्थ्यांचा पालक मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या अमृतवाहिनी एम.बी.ए. महाविद्यालयात प्रथम वर्षीय विद्यार्थ्यांचा पालक मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच प्रथम वर्षीय विद्याथ्यर्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी डॉ. बी. एम. लोंढे म्हणाले कि, लोकनेते बाळासाहेब थोरात, मा आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी शिक्षण संस्थेने नेत्र दीपक अशी प्रगती साधली आहे. गुणवत्ता म्हणजे अमृतवाहिनी असे नाव देशपातळीवर झळकले आहे. विद्यार्थ्यांच्या यशामध्ये विद्यार्थी, पालक आणि महाविद्यालय या तिन्ही घटकांचा समन्वय अत्यंत महत्त्वाचा असतो . विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाकडून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या शैक्षणिक व प्रशिक्षणात्मक सुविधांचा जास्तीत जास्त उपयोग करून आपल्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधावा. पालकांनीही आपल्या पाल्याच्या अभ्यासाबरोबरच त्यांची मानसिकता, आवडी-निवडी, कौशल्ये आणि भविष्यातील करिअरच्या संधी याबाबत सकारात्मक संवाद साधावा. पालक आणि महाविद्यालय यांच्यात सातत्यपूर्ण संवाद व परस्पर सहकार्य राहिल्यास विद्यार्थ्यांच्या प्रगतीला निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या पालक मेळाव्याचे संयोजक डॉ. एन. एस. जोंधळे यांनी प्रस्तावना मांडली. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित पालकांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर महाविद्यालयाची शैक्षणिक वाटचाल, विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम तसेच उपलब्ध शैक्षणिक व प्रशिक्षण सुविधांची माहिती पालकांना देण्यात आली. पालक मेळाव्यात महाविद्यालयातील विविध विभाग, शैक्षणिक सुविधा, विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारे उपक्रम आणि उपलब्ध मार्गदर्शन व्यवस्था याबाबत पालकांना माहिती देण्यात आली. पालकांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक व विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांचे कौतुक करून विविध सूचना, प्रश्न व अपेक्षा मांडल्या. यावेळी पालक प्रतिनिधी म्हणून डॉ. कैलास दौंड, आनंद कानडी आणि गोरख पवार यांनी मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संचालक डॉ. बी. एम. लोंढे, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक प्रगतीसाठी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, विश्वस्त आमदार डॉ. सुधीर तांबे, विश्वस्त सौ. शरयू देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे आणि व्यवस्थापक प्रा. व्ही. बी. धुमाळ यांनी वेळोवेळी मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले आहे.



