आपला जिल्हा

ब्राम्हण समाजासाठी सदैव सर्वोतोपरी सहकार्य -आ. आशुतोष काळे

ब्राम्हण समाजासाठी सदैव सर्वोतोपरी सहकार्य -आ. आशुतोष काळे

कोपरगावात श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या आश्वारुढ पुतळ्याचे अनावरण

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २८ जुलै २०२५ :- काळे परिवाराचा समाजकारणाचा वारसा पुढे चालवितांना ब्राम्हण समाजाच्या अडी अडचणी सोडवून ब्राह्मण सभागृहासाठी जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न केला आहे. दिलेल्या निधीतून काही विकासकामे पूर्ण होत असून काही कामे भविष्यात होणार आहे. यापुढील काळातही निधीची आवश्यकता भासल्यास निधीची कमतरता पडू देणार नाही. कोणतीही गरज लागली तरी ब्राम्हण समाजासाठी माझे सदैव सर्वोतोपरी सहकार्य राहील अशी ग्वाही आ.आशुतोष काळे यांनी दिली.

जाहिरात

कोपरगाव शहरात ब्राह्मण सभा कोपरगाव यांच्या वतीने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारुढ पुतळ्याचा अनावरण सोहळा व गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा शनिवार (दि.२६) रोजी मा. खा. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या शुभहस्ते व आ. आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला याप्रसंगी ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की, श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांनी कमी वयात गाजवीलेल्या शौर्याचा मराठा बांधवांना अभिमान असून त्यांचे कार्य कधीही विसरू शकत नाही. त्यांच्या कार्याची आठवण कायम स्मरणात राहावी यासाठी पुण्यात श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा पुतळा उभारण्यात आला असून त्यानंतर आपल्या कोपरगाव शहरात देखील श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा उभारण्यात आला याचा आनंद वाटतो. ब्राम्हण सभेच्या प्रत्येक कार्यात सहभागी होता येते हे माझे भाग्य आहे. आपल्यामुळे मला पुन्हा एकदा विधानसभा सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आपले आशीर्वाद असेच पाठीशी ठेवा आपल्याला माझी मदत लागल्यास मी सर्वतोपरी मदत करीन असे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.

जाहिरात

 यावेळी मा.आ. स्नेहलता कोल्हेपुण्याच्या थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठाणचे सचिव कुंदनकुमार साठेविश्वस्त श्रीकांत नगरकरचिंतामणी क्षीरसागरपेशवे घराण्याचे वंशज चंद्रशेखर बर्वेअखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे कोषाध्यक्ष प्रविण कुलकर्णीकोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष संजय सातभाईकोपरगाव ब्राह्मण सभेचे अध्यक्ष मकरंद कोऱ्हाळकरउपाध्यक्ष बाळकृष्ण कुलकर्णीसचिव सचिन महाजनखजिनदार जयेश बडवेसंघटक महेंद्र कुलकर्णीगौरीष लव्हुरीकरसंदीप देशपांडेयोगेश कुलकर्णीअजिंक्य पदेसदस्य  ऐश्वर्याताई सातभाईप्रसाद नाईकवसंतराव ठोंबरेसंजीव देशपांडेअनिल कुलकर्णीडॉ. मिलिंद धारणगावकरसदाशिव धारणगावकरअॅड. श्रद्धा जवाद, वंदना चिकटे आदी मान्यवरांसह गुणवंत विद्यार्थीराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारीमाजी नगरसेवककार्यकर्ते व ब्राम्हण समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे