एस एस जी एम महाविद्यालयाचे प्रा. सुभाष सैंदनशिव यांचा सेवापूर्ती सत्कार

एस एस जी एम महाविद्यालयाचे प्रा. सुभाष सैंदनशिव यांचा सेवापूर्ती सत्कार
एस एस जी एम महाविद्यालयाचे प्रा. सुभाष सैंदनशिव यांचा सेवापूर्ती सत्कार
Kopargaon vijay kapse दि १ सप्टेंबर २०२६ : रयत शिक्षण संस्थेच्या एस.एस.जी.एम. महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा. सुभाष सैंदनशिव हे नियत वयोमानानुसार ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेबद्दल महाविद्यालयात सेवापूर्ती सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा. डॉ. बंडेराव तऱ्हाळ होते. प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. घनश्याम भगत यांच्यासह प्रा. डॉ. निलेश मालपुरे, प्रा. मोहनसिंग पाडवी, डॉ. विलास गाडे व योगेश खिल्लारी यांनी मनोगतातून प्रा. सैंदनशिव यांच्या कर्तव्यनिष्ठा, सेवाभावी वृत्ती आणि महाविद्यालयीन योगदानाचा गौरव केला.

अध्यक्षीय मनोगतात प्रा. डॉ. बंडेराव तऱ्हाळ यांनी प्रा. सैंदनशिव यांच्या सातत्यपूर्ण व प्रामाणिक सेवेसाठी कौतुक करून त्यांच्या पुढील आयुष्यास शुभेच्छा दिल्या.

यावेळी कार्यालय अधीक्षक सुनील गोसावी, विज्ञान शाखेतील विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच सेवक कल्याण मंडळातील सहकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालय सेवक कल्याण समितीच्या वतीने करण्यात आले. आभार डॉ. नामदेव आडमुठे यांनी मानले.




