आपला जिल्हा

के.जे.सोमैया महाविद्यालयात तीन दिवसीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन…

के.जे.सोमैया महाविद्यालयात तीन दिवसीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन

के.जे.सोमैया महाविद्यालयात तीन दिवसीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २० जानेवारी २०२६के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात कोपरगाव तालुका बॅडमिंटन असोसिएशन व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव तालुक्याचे माजी आमदार कै. के.बी. रोहमारे (दादा) यांच्या स्मरणार्थ येत्या 23 ते 25 जानेवारी 2026 या कालावधीत तीन दिवसीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय ठाणगे यांनी दिली आहे. ही स्पर्धा सहा गटात घेण्यात येणार असून महाविद्यालयातील आंतरराष्ट्रीय PU सिंथेटिक कोर्टवर खेळविली जाणार आहे.

जाहिरात

या स्पर्धेचे उद्घाटन कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार आशुतोष काळे, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे,  कोपरगाव तालुका बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष संदिपराव रोहमारे, उपाध्यक्ष सत्येन मुंदडा, सचिव मा. सागर रोडे,  सुनिल बोरा,  एस.पी.कुलकर्णी, आजिनाथ ढाकणे,  अतुल शिंदे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांच्या शुभहस्ते होणार असून या बॅडमिंटन स्पर्धेसाठी राज्यभरातून विविध खेळाडू, मार्गदर्शक व क्रिडा रसिक उपस्थित राहणार आहे.

जाहिरात

तीन दिवस खेळल्या जाणाऱ्या या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत राज्यभरातून अनेक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. या स्पर्धेसाठी एक लाखाचे बक्षीस ठेवण्यात आले असून उत्कृष्ट महिला व पुरूष खेळाडूंना पारितोषिक देण्यात येणार आहे. या बॅडमिंटन स्पर्धेचे प्रायोजकत्व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना यांनी घेतले असून या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार  आशुतोषदादा काळे यांच्या उपस्थितीत होणार आहे.

या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे यशस्वी आयोजन कोपरगाव तालुका बॅडमिंटन असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. सुनील कुटे, क्रिडा शिक्षक मिलिंद कांबळे व सर्व क्रिडाप्रेमी करणार आहेत. या बॅडमिंटन स्पर्धेसाठी सर्व क्रिडा रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन कोपरगाव तालुका बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष संदिपराव रोहमारे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी केले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे