आपला जिल्हा

कॅन्सर सेंटरस ऑफ अमेरिका नाशिक व वृंदावन डायग्नोस्टिक सर्व्हिसेस कॅन्सर रुग्णांना ठरणार वरदान

कॅन्सर सेंटरस ऑफ अमेरिका नाशिक व वृंदावन डायग्नोस्टिक सर्व्हिसेस कॅन्सर रुग्णांना ठरणार वरदान

कॅन्सर सेंटरस ऑफ अमेरिका नाशिक व वृंदावन डायग्नोस्टिक सर्व्हिसेस कॅन्सर रुग्णांना ठरणार वरदान
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १२ ऑक्टोबर २०२५ग्रामीण भागातील कॅन्सर रुग्णांसाठी उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा अधिक सुलभ आणि सहज उपलब्ध करून देणे या उद्देशाने नाशिक येथील अशोक कॅन्सर सेंटरस ऑफ अमेरिका व कोपरगाव येथील वृंदावन डायग्नोस्टिक सर्व्हिसेस यांच्या सेंटर उत्तर महाराष्ट्रातील कॅन्सर रुग्णांना वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादन शनिवार दिनांक ११ ऑक्टोबर रोजी उद्घाटन प्रसंगी सेंटर प्रशासनाच्या वतीने “सहकार्य उद्घाटन व संवाद सोहळ्याप्रसंगी सांगण्यात आले.

जाहिरात
या कार्यक्रमास नाशिक येथील कॅन्सर सेंटर ऑफ अमेरिका येथील वरिष्ठ सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. राजेश वाळवेकर, कॅन्सर सेंटर ऑफ अमेरिका मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. लोविन विल्सन तसेच वृंदावन डायग्नोस्टिक सर्व्हिसेस कोपरगावचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संदीप मुरुमकर  उपस्थित होते.

जाहिरात
या सहकार्याचा उद्देश ग्रामीण भागातील कॅन्सर रुग्णांसाठी उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा त्यांच्या तालुक्यातच सुलभ, सहज आणि परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देणे हा आहे. विशेष म्हणजे या उपक्रमाअंतर्गत शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत तसेच खाजगी इन्शुरन्स योजनांमार्फत मोफत कॅन्सर उपचाराची सुविधा उपलब्ध होणार आहे.
या माध्यमातून दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी कॅन्सर सेंटर ऑफ अमेरिकाचे तज्ञ डॉक्टर कोपरगावमध्ये उपस्थित राहून कॅन्सर रुग्णांची सल्लामसलत आणि तपासणी करणार आहेत. त्यामुळे रुग्णांना आता प्राथमिक निदान, सल्लामसलत व फॉलोअपसाठी नाशिकला जाण्याची गरज उरणार नाही.
त्यामुळे आता ग्रामीण भागातील गरजू आणि गरीब रुग्णांना सर्व सोयी-सुविधांनी युक्त हॉस्पिटलमध्ये शासन योजनेत मोफत उपचार मिळणार आहेत. यामुळे ग्रामीण रुग्णांसाठी मोठा दिलासा मिळाला असून, वेळेवर निदान आणि उपचाराची संधी तालुक्याच्या स्तरावरच मिळू शकणार आहे.

जाहिरात
डॉ. राजेश वाळवेकर आणि डॉ. लोविन विल्सन यांनी ग्रामीण भागात कॅन्सर उपचार सुलभ करण्याचा हा उपक्रम आरोग्य क्षेत्रात मोठा बदल घडवेल, असे सांगितले. तसेच डॉ. संदीप मुरुमकर यांनी वृंदावन डायग्नोस्टिक सर्व्हिसेसमध्ये उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक तपासण्यांची माहिती दिली.
या भागीदारीमुळे कोपरगाव व परिसरातील कॅन्सर रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत तसेच खाजगी इन्शुरन्स योजनांद्वारे मोफत, तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांसह उपचार मिळणार असून, ही ग्रामीण भागातील आरोग्यसेवेसाठी एक ऐतिहासिक पाऊल ठरले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे