आपला जिल्हा

कर्जदाराचे कर्जफेडीपोटी खोटा चेक दिल्याने जामिनदारास शिक्षा

कर्जदाराचे कर्जफेडीपोटी खोटा चेक दिल्याने जामिनदारास शिक्षा

कर्जदाराचे कर्जफेडीपोटी खोटा चेक दिल्याने जामिनदारास शिक्षा

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २२ जुलै २०२५कोपरगांव शहरातील ज्योती सहकारी पतसंस्था यांचेकडून  बाबुराव एकनाथ नरोडे यांनी घेतलेल्या कर्जाचे परतफेडीपोटी त्यांचे जामीनदार सुरेश बाबुराव नरोडे यांनी दिलेला ८ लाख रुपयांचा चेक न वटल्याने ज्योती पतसंस्थेने त्यांचेवर व रितसर कोपरगांव येथील न्यायालयात फौजदारी गुन्हा एस.सी.सी.नं.१९८/२०१७ दाखल केला होता. त्यामध्ये चौकशीअंती आरोपी सुरेश बाबुराव नरोडे यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने

जाहिरात

कोपरगांव येथील न्यायाधीश  जी. डी. अग्रवाल साहेब यांनी आरोपीस १२ महिन्याचे साधा कारावासाची शिक्षा ठोठावली तसेच फिर्यादी ज्योती पतसंस्थेस रु. १५ लाखाची नुकसान भरपाई देण्याचा आदेश केला तसेच नुकसान भरपाईची रक्कम निकाल तारखेपासून ३० दिवसात पतसंस्थेस न दिल्यास आरोपीस पुन्हा ६ महिन्याचे साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. याकामी अॅडव्होकेट  एस्.डी. काटकर यांनी कामकाज पाहिले.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे