कोपरगाव विजय कापसे दि २३ सप्टेंबर २०२५– ग्रामीण भागातील ब्युटी पार्लर क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या महिला व मुलींना सौंदर्य क्षेत्रात उच्च दर्जाचे खुले व्यासपीठ मिळावे या उद्देशाने कोपरगाव शहरात ताराराणी मल्टीट्रेड अँड सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व रिच लुक ब्युटी पार्लर यांच्या वतीने गुरुवारी १८ सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या मिस अहिल्यानगर ब्युटी कॉम्पिटिशन ला मोठ्या प्रमाणात महिलांचा प्रतिसाद मिळाला.
जाहिरात
या कॉम्पिटिशन मध्ये अनेक महिला मुलींनी सहभाग नोंदवत आपले कलागुण सादर केले यात मिस अहिल्यानगर चा प्रथम क्रमांकाचा किताब शुभांगी काळुगे, द्वितीय क्रमांकाचा कविता चव्हाणके हिने तर तृतीय क्रमांकाचा किताब कोमल दुरगवडे यांनी मिळावला तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना सन्मानपत्र सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
जाहिरात
प्रसंगी मिस इंडिया नक्षत्र २०२२ प्रियंका मोरे यांनी इंटरनॅशनल मेकअप वर उपस्थितांना मार्गदर्शन करत मेकप प्रात्यक्षिक दाखवले तसेच सारेगमप लिटिल चाम्प विजेती गौरी पगारे व गायिका अदिती साळवे यांनी गाण्याचे सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली.
तर याप्रसंगी प्रसिद्ध सिनेमा निर्माते शरद उगले, मालेगाव येथील जेष्ठ ब्युटीशन शैला अहिररराव, ताराराणी मल्टीट्रेड अँड सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सर्वेसर्वा भाऊसाहेब वाघ, समृद्धी शहर व्यवस्थापक हर्षा पाटील, मेकप आर्टिस्ट अंजु मक्कड, कार्यक्रमाचे मुख्य आयोजक तथा ताराराणीच्या संचालिका जयश्री रोहमारे, संचालिका पूनम वाघ, खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे कलाकार संदीप जाधव आदी मान्यवर उपस्थित होते तर ही स्पर्धा यशस्वीतेसाठी ताराराणी व रिच लुक ब्युटी पार्लरच्या सर्वांनी अथक परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भागश्री जगताप यांनी केले.