आपला जिल्हा

एसएसजीएम महाविद्यालयात बँकिंग व केंद्रीय शासन स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील नोकरीच्या संधी” या विषयावर एकदिवसीय मार्गदर्शन  शिबिर संपन्न

एसएसजीएम महाविद्यालयात बँकिंग व केंद्रीय शासन स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील नोकरीच्या संधी” या विषयावर एकदिवसीय मार्गदर्शन  शिबिर संपन्न
बँकिंग व केंद्रीय स्पर्धा परीक्षा : युवकांसाठी
करिअरच्या मोठ्या संधी — अक्षय चोळके 
कोपरगाव विजय कापसे दि ३१ डिसेंबर २०२५ विद्यार्थ्यांना बँकिंग, केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC), कर्मचारी निवड आयोग (SSC) तसेच इतर केंद्रीय शासन परीक्षामध्ये  मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध झाली आहे.असे प्रतिपादन सारथी एज्युकेशन, छ. संभाजीनगर येथील संचालक मा. अक्षय चोळके यांनी केले. ते रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज विज्ञान, गौतम आर्ट्स ॲन्ड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव येथे सारथी एज्युकेशन संस्था छत्रपती संभाजीनगर, व रयत स्पर्धा परीक्षा अकॅडमी, आय.क्यू.एसी, वाणिज्य व व्यवस्थापन विभाग, अर्थशास्त्र विभाग तसेच करिअर काउन्सिलिंग व प्लेसमेंट सेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “बँकिंग व केंद्रीय शासन स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील नोकरीच्या संधी” या विषयावर एकदिवसीय मार्गदर्शन  शिबिरात बोलत होते. सदर कार्यशाळेचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी भूषविले.

जाहिरात
   अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी विद्यार्थ्यांनी सातत्य, शिस्त व योग्य मार्गदर्शनाच्या आधारे स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे, असे आवाहन केले.  कार्यशाळेचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत डॉ. अर्जुन भागवत यांनी केले. सदर कार्यशाळेसाठी  कला विभागाचे उपप्रचार्य डॉ. बंडेराव तऱ्हाळ, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. घनश्याम भगत प्रा. किरण पवार, प्रा. दिलीप भोये, प्रा. योगिता भिलोरे, प्रा. बाळू वाघमोडे, प्रा.भागवत देवकाते, प्रा. महेश दिघे, प्रा. सुरज हूसळे, यांसह वाणिज्य व कला शाखेतील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात
 सदर कार्यशाळेचे  सूत्रसंचालन डॉ. भागवत देवकाते व प्रा. सुनील काकडे यांनी केले, तर आभारप्रदर्शन डॉ. सीमा दाभाडे यांनी केले.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे