आपला जिल्हा

प्रत्येक गोष्टीत राजकारण करणे ही काळे गटाची नीचनीती; मोकाट आजारी जनावराबद्दल राष्ट्रवादीला उशिरा आलेली जाग राजकीय नौटंकी : प्रशांत कडू

प्रत्येक गोष्टीत राजकारण करणे ही काळे गटाची नीचनीती; मोकाट आजारी जनावराबद्दल राष्ट्रवादीला उशिरा आलेली जाग राजकीय नौटंकी : प्रशांत कडू
प्रत्येक गोष्टीत राजकारण करणे ही काळे गटाची नीचनीती; मोकाट आजारी जनावराबद्दल राष्ट्रवादीला उशिरा आलेली जाग राजकीय नौटंकी : प्रशांत कडू
Kopargaon vijay kapse दि १६ सप्टेंबर २०२६–आधीच आजारी असलेल्या गायीला नागरिकांच्या सूचनेनंतर कोपरगाव नगरपरिषदेच्या कोंडवाड्यात आणल्यानंतर उपचार सुरू असताना बुद्धिभेद करण्यासाठी त्याचेही राजकारण करण्यात धन्यता मानणाऱ्या राष्ट्रवादी काळे गटाचा नगरसेवक प्रशांत कडू यांनी जोरदार समाचार घेतला आहे.कोपरगाव शहरातील मोकाट जनावरांची संख्या कमी करण्यासाठी पालिका प्रशासनाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कारवाईला नागरिकांचा प्रतिसाद मिळत असताना, नागरिकांच्या अपेक्षेनुसार काम होत असल्याचे दुःख राष्ट्रवादी काळे गटाला होत असल्याने प्रत्येक चांगल्या कामात राजकारण करण्याची त्यांची नीचनीती सुरू असल्याची घणाघाती टीका नगरसेवक प्रशांत कडू यांनी केली.

जाहिरात
शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, या मागणीसाठी एकीकडे ५० लोकांचा मोर्चा काढायचा आणि दुसरीकडे पालिका प्रशासनाने प्रत्यक्ष कारवाई केल्यानंतर त्याच कारवाईचे उलटे विरोधाभास असणारे राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न करायचा, ही काळे गटाची दुटप्पी भूमिका असल्याचे कडू यांनी म्हटले आहे.
मोकाट जनावरांना पकडून गोशाळेत पाठविण्याची कार्यवाही पालिका प्रशासनाकडून करण्यात आली असून, त्यासंदर्भातील रेकॉर्डही पालिकेकडे उपलब्ध आहे. मात्र, प्रशासनाकडून वस्तुस्थिती जाणून घेण्याची तसदी न घेता माध्यमांसमोर अर्धवट माहिती मांडून राजकीय नाट्य उभे करणे, ही काळे गटाची हास्यास्पद अवस्था असल्याचा टोला कडू यांनी लगावला.

जाहिरात
एखादे मुक जनावर आजारी असल्याची माहिती नागरिकांकडून मिळाल्यानंतर पालिका प्रशासन संबंधित जनावराला ताब्यात घेऊन त्याच्यावर उपचार करण्याचे काम करत आहे. अशा परिस्थितीतही घटनास्थळी जाऊन मनोकल्पित आरोप करत राजकीय वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे कडू यांनी सांगितले.मुक्या जनावरांच्या सेवेत खरोखरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना असेल, तर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केवळ राजकारण न करता आजारी जनावरांची देखभाल करण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहनही प्रशांत कडू यांनी केले. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना स्वतः नगरसेवक असताना देखील पालिकेत माहिती मिळू शकते हे ठाऊक असूनही माध्यमांसमोर पकडलेली जनावरे कुठे गेली ही माहिती मिळत नाही अशी धादांत खोटी माहिती देण्याचा केविलवाना प्रयत्न केला. पालिकेने पकडलेली जनावरे गोशाळेत पाठवण्यात आली आहेत याचा अभ्यास राजकीय स्टंट करण्यापूर्वी करायला हवा होता अशी कोपरखळी लगावली.

जाहिरात
पालिका प्रशासनाचे मोकाट जनावरांबाबतचे काम नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहे. नागरिकांच्या तक्रारी आणि मागण्यांची दखल घेत प्रशासन कार्यवाही करत आहे. त्यामुळे कामात अडथळे निर्माण करण्याऐवजी काळे गटाला खरोखरच या विषयात काम करण्याची इच्छा असेल, तर त्यांनी पुढे येऊन जबाबदारी स्वीकारावी. पालिकेचे काम सुरूच राहणार,मात्र विरोधकांचे कामापेक्षा राजकारणाला प्राधान्य देण्याची भूमिका जनतेसमोर उघड झाली आहे, असा घणाघातही कडू यांनी केला.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे