आपला जिल्हा

श्रीमंत पवार सरकार संस्थानचे महादेव देवस्थान येथे गुढी उभारणी

श्रीमंत पवार सरकार संस्थानचे महादेव देवस्थान येथे गुढी उभारणी

श्रीमंत पवार सरकार संस्थानचे महादेव देवस्थान येथे गुढी उभारणी

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १९ मार्च २०२६कोपरगांव येथील जुने गांवठाण सराफ बाजार येथील श्रीमंत महामहिम पवार सरकार संस्थानचे “सोमेश्वर महादेव देवस्थान”, कोपरगांव बेट येथील “श्रीमंत महादेव देवस्थान”, जेऊर कुंभारी येथील “गंगेश्वर महादेव देवस्थान” येथे पारंपरिक पद्धतीने गुढी उभारुन सण- उत्सवाचा शुभारंभ करण्यात आला आहे.

जाहिरात

प्रारंभी सोमेश्वर महादेव शिवलिंगावर अभिषेक करुन पुजन करण्यात आले. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने गुढी उभारण्यात आली. तसेच कोपरगांव नगरीचा स्वातंत्रपुर्व काळापर्यंत कारभार पहाणारे श्रीमंत पवार सरकार यांचे प्रतिमेचे पुजन करण्यात आले.

जाहिरात

सोमेश्वर भक्त संतोष फटांगरे, प्रसिद्ध श्रीगणेश फरसाणचे संचालक सोमनाथ लाडे, श्रेयस लाडे, पौरोहित्य मिलिंदशास्री चौधरी, प्रशांतस्वामी जंगम, नंदू शेंडे (गुरव) यांनी पुजन केले. सोमेश्वर महादेव देवस्थानचे भक्त उपस्थित होते.

जाहिरात

गुढी उभारणी नंतर लाडू आणि शुभेच्छा पत्रवाटप करुन देवस्थानचे प्रमुख महेंद्र पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी सुशांत घोडके आणि महादेव भक्त परिवाराने भारत नवंवर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे