आपला जिल्हा

कोपरगाव विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांचे राजकीय चित्र बदलणार : शिवाजी जाधव

 कोपरगाव विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांचे राजकीय चित्र बदलणार : शिवाजी जाधव

कोपरगाव विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांचे राजकीय चित्र बदलणार : शिवाजी जाधव

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि १९ सप्टेंबर २०२६–एसआरआय मोहिमेअंतर्गत कोपरगाव विधानसभा मतदारसंघात करण्यात आलेल्या मतदार पुनर्सर्वेक्षणात मोठ्या प्रमाणावर दुबार बोगस व मयत मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. या प्रक्रियेत ग्रामीण व शहरी भागातील एकूण २ लाख ८७ हजार ७०७ मतदारांपैकी ३७ हजार ६३१ दुबार मतदारांची नावे कमी करण्यात आली असून, आता मतदारसंख्या २ लाख ५० हजार ७६ इतकी राहिली आहे. प्रत्येक निवडणुकीत सत्तेचा व आर्थिक आमिषांचा वापर करणाऱ्या तालुक्यातील प्रस्थापिकांना या कमी झालेल्या मतदानाचा चांगलाच फटका बसणार असून सर्वसामान्य उमेदवाराला याचा फायदा होणार आहे.

जाहिरात

मतदारसंख्येत झालेल्या या मोठ्या बदलाचा परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर तसेच भविष्यातील २०२९ च्या कोपरगाव विधानसभेत दिसून येईल. या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य उमेदवार निवडून आला तर प्रस्थापितांना चांगली चपराक बसेल असे शिवसेनेचे कोपरगाव तालुका बुथ प्रमुख शिवाजी जाधव यांनी सांगितले.

जाहिरात

तालुक्याचा राजकीय इतिहास बघितला असता प्रस्थापिताकडे असलेल्या दोन्ही कारखान्याचे मनुष्यबळ व आर्थिक ताकद या जोरावरती आजपर्यंतच्या निवडणुका या दोघांपैकी एकाने जिंकलेल्या आहेत यामध्ये विधानसभेचे मतदान करून घेतानी दुबार मतदार किंवा बोगस मतदारांच्या संख्येचा फायदा याच मंडळींना झाल्याचे आजपर्यंत दिसून आलेले आहे. विधानसभेतील सर्वसामान्य मतदारांचा कल वेगळा जरी असला तरी एकूण मतांच्या 37 हजार मतदार हे जवळपास 14% आहेत त्यामुळे ही मोठी संख्या निकालावरती परिणाम करत होती .प्रस्थापिता व्यतिरिक्त उमेदवाराकडे मनुष्यबळ व आर्थिक ताकद नसल्याने या 14 टक्के मतदारांचा फायदा त्या उमेदवाराला होत नव्हता आता हे ३७००० मतदार एकूण विधानसभेच्या मतदार संघातून कमी झाल्याने प्रस्थापितांना ही निवडणूक सोपी राहिलेली नाही आता प्रत्यक्ष विधानसभा मतदारसंघांमध्ये जागेवर असणाऱ्या मतदारांवरती निवडणूक अवलंबून असल्याने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था किंवा विधानसभेच्या निकाल वेगळा लागू शकतो अशी चर्चा पूर्ण विधानसभा मतदारसंघांमध्ये सुरू झालेली आहे.
आगामी काळात आता तालुक्यातील प्रस्थापितांच्या सत्ता व आर्थिक ताकतीपेक्षा सुज्ञ मतदार सर्वसामान्य उमेदवाराला प्राधान्य देतील असा विश्वास जाधव यांनी व्यक्त केला.

शिवाजी जाधव

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे