आपला जिल्हा

स्पर्धा परीक्षात यश संपादन केल्याबद्दल अमृतवाहिनी मॉडेल येथे विद्यार्थ्यांचा गौरव 

स्पर्धा परीक्षात यश संपादन केल्याबद्दल अमृतवाहिनी मॉडेल येथे विद्यार्थ्यांचा गौरव
स्पर्धा परीक्षात यश संपादन केल्याबद्दल अमृतवाहिनी मॉडेल येथे विद्यार्थ्यांचा गौरव 
जाहिरात

संगमनेर विजय कापसे दि १५ जुलै २०२५अमृतवाहिनी मॉडेल स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे स्पर्धा परीक्षा यश सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. JEE व MHT-CET 2025 या राष्ट्रीय व राज्यस्तरीय परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन द्रोणगिरी सभागृहात करण्यात आले होते.

जाहिरात
    यावेळी अकॅडेमिक डायरेक्टर डॉ. जे. बी. गुरव, अमृतवाहिनी कनिष्ठ महावि‌द्यालयाचे प्राचार्य आशिष कुमार यांसह मान्यवर उपस्थित होते. शालेय अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कला, गुणांना वाव देण्यासाठी अमृतवाहिनी संस्थेत सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन केले जात असते. त्याचाच एक भाग म्हणून स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम ठेवण्यात आला त्यामुळे इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणार आहे.

जाहिरात
       यावेळी  कु. प्रीती रक्ते (PCM गट – ९७.५०%) हिने आपला अभ्यासक्रम, ध्येय निश्चिती व तयारीचा प्रवास विद्यार्थ्यांसोबत शेअर केला. कु. सार्थक हासे आणि अफ्फान शेख यांनी इयत्ता १२ वी च्या वि‌द्यार्थ्यांना आपल्या अनुभवातून प्रेरणा दिली व परीक्षेला सामोरे जाताना आत्मविश्वास कसा वाढवावा हे सांगितले.
           या कार्यक्रमास सर्व विद्यार्थी, पालकवर्ग तसेच शिक्षक व महाविद्यालयांतील सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामुळे कार्यक्रमास एक सुसंस्कृत व प्रेरणादायी स्वरूप लाभले.
          या  कार्यक्रमाबाबत  राज्याचे माजी महसूल मंत्री तसेच संस्थेचे अध्यक्ष लोकनेते  बाळासाहेब थोरात, संस्थेचे विश्वस्त डॉ. सुधीरजी तांबे, संस्थेच्या विश्वस्त शरयू देशमुख , संस्थेचे कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे , व्यवस्थापक प्राचार्य व्हि.बि. धुमाळ, अकॅडेमिक डायरेक्टर डॉ. जे.बी गुरव, प्राचार्य.  आशिष कुमार, सर्व विभाग प्रमुख व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे