आपला जिल्हा

संजीवनी फार्मसीच्या २४ विद्यार्थ्यांची ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स कंपनीत नोकरीसाठी निवड

संजीवनी फार्मसीच्या २४ विद्यार्थ्यांची ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स कंपनीत नोकरीसाठी निवड


                          महाविद्यालयाच्या ऑटोनॉमस दर्जामुळे  उद्योगक्षेत्राच्या गरजेनुसार अभ्यासक्रमाचा फायदा

जाहिरात

कोपरगांव विजय कापसे दि ४ मार्च २०२६-:संजीवनी फार्मसी महाविद्यालयाला  ऑटोनॉमस दर्जा प्राप्त असल्याने उद्योगक्षेत्राच्या गरजेनुसार अभ्यासक्रम तयार करण्यात आला. त्याचा परिणाम म्हणून या महाविद्यालयातील तब्बल चोविस विद्यार्थ्यांना एकाचवेळी ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स कंपनीत नोकरीची संधी मिळाली. या सर्व विद्यार्थ्यांना कंपनीने आकर्षक वेतन देऊ केले आहे. महाविद्यालयाच्या ट्रेनिंग प्लेसमेंट विभागाच्या नियोजनबध्द प्रयत्नामुळे विद्यार्थ्यांना एकापाठोपाठ एक नोकरीच्या उत्तम संधी मिळत आहेत.

जाहिरात

     ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स ही नामांकित औषध निर्मिती कंपनी आहे. या महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचा नामांकित कंपन्यांच्या व्यवस्थापना सोबत सातत्याने संपर्क असतो.  कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हच्या माध्यमातून पार पडलेल्या या निवड प्रक्रियेत संजीवनीच्या या  विद्यार्थ्यांनी गुणवत्तेच्या जोरावर चांगल्या कंपनीत चांगल्या वेतनाच्या नोकरीची संधी प्राप्त केली.   निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये बी. फार्मसीच्या सोमनाथ रामराव अव्हाड, अनुष्का सुनिल देशमानकर, मधुरा धनंजय देव,अक्षय दादासाहेब रक्ताटे, प्राची सोपान कदम, तमन्ना तैनुर सय्यद, यश  कुमार भोसले, सानिका पोपट शेटे, धनंजय अशोक शिंदे , पुजा भाऊलाल सांगळे, श्रेया गोरक्षनाथ आहेर, श्रध्दा देविदास माळी, साक्षी संजय मांजरे, रूपाली बाळासाहेब शिंदे , गायत्री विजय जाधव, अंजली सुनिल जाधव व अवांतिका गणेश  दोडे यांचा समावेश  आहे. याच कंपनीने एम.फार्मसीच्या अजय श्रीकृष्ण  काटे, मनीषा वासुदेव भडे, प्राजक्ता प्रकाश  निर्भवणे, साक्षी मच्छिंद्र शेळके, भावना संतोष  नलगे, फाल्गुणी जितेंद्र छाजेड व अश्विनी  फकिरचंद दळे यांची निवड केली आहे.

जाहिरात

      संस्थेचे अध्यक्ष  नितिन कोल्हे यांनी हे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले. तसेच संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे   मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.  यावेळी महाविद्यालयाचे डायरेक्टर डॉ. विपुल पटेल, हेड ऑफ अकॅडमिक गव्हर्नन्स डॉ. रावसाहेब शेंडगे , ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे डीन डॉ. प्रमोद कडू, प्रा. निखिल गुलघने व प्रा. प्रतिक्षा घोडके आदि उपस्थित होते.

जाहिरात


ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स ही औषध निर्माण क्षेत्रातील नामांकित कंपनी म्हणून परिचित आहे. या कंपनीला हवे असलेले कुशल मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने संजीवनी फार्मसी विद्यालयातील ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाने विद्यार्थ्यांवर मेहनत  घेतली. त्यामुळे पहिल्याच मुलाखतीत या कंपनीने एकाच वेळी चोविस विद्यार्थ्यांना नोकरीची संधी दिली. हे टिमवर्क आणि उदीष्टपूर्तीसाठी झटणा-या संजीवनी परिवारातील प्रत्येकाचे यश आहे.अमित कोल्हे (कार्यकारी विश्वस्त, संजीवनी शैक्षणीक संकुल)

 

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी संजीवनी फार्मसी महाविद्यालयाच्या २४ विद्यार्थ्यांचा ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स कंपनीत निवड झाल्यबध्दल सत्कार केला. सत्कारानंतर टिपलेले छायाचित्र. यावेळी डॉ. पटेल, डॉ. शेंडगे , डॉ. कडू, प्रा. गुलघणे व प्रा. घोडके उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे