नगरपरिषदेकडून ड्रेनेज साफसफाईसाठी जेटिंग मशीनचे लोकार्पण

राज्यात प्रथम भूमिगत गटारी साफसफाई साठी आधुनिक जेटिंग मशीन
संगमनेर नगरपरिषदेचे काम राज्यासाठी आदर्शवत ठरेल – माजी मंत्री थोरात

संगमनेर विजय कापसे दि १८ जानेवारी २०२६– लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर नगर परिषदेने सातत्याने नागरिकांना अत्याधुनिक व चांगल्या सुविधा दिल्या आहेत. शहरात भूमिगत गटारे योजना असून पावसाळ्यात किंवा इतर काळात तातडीने व सुरक्षित पद्धतीने गटारी व ड्रेनेज साफ करण्यासाठी अत्याधुनिक जेटिंग मशीन घेण्यात आली असून या नवीन मशीनचे लोकार्पण लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते करण्यात आला असून संगमनेर नगरपालिका आपल्या चांगल्या कामामधून राज्यात आदर्शवत ठरेल असा विश्वास मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे नगरपालिकेने घेतलेल्या 5 हजार लिटर क्षमतेच्या जेटिंग मशीनचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी मा.महसूल व कृषिमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, नगराध्यक्ष डॉ.मैथिलीताई तांबे, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख, नगरसेवक दिलीपराव पुंड,विश्वासराव मुर्तडक, सोमेश्वर दिवटे, नितीन अभंग, सौरभ कासार, गजेंद्र अभंग, डॉ.दानिश, किशोर टोकसे, सीमा खटाटे, भारत बोऱ्हाडे, अर्चना दिघे, शोभा पवार, प्राची काशीद, किशोर पवार,डॉ.अनुराधा सातपुते,सौ.वनिता गाडे, मालती डाके, दिपाली पंचारिया, गणेश गुंजाळ, अमजद पठाण, श्रीमती विजया गुंजाळ, सरोजना पंडित, प्रियांका शहा, शैलेश कलत्री, नंदा गरुडकर, लाला पठाण,सोमेश्वर दिवटे,मुख्य कार्यकारी अधिकारी दयानंद गोरे, अभियंता पंकज मुंगसे, अमजद पठाण, प्रशांत जुन्नारे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.

शहरातील भूमिगत गटारी व ड्रेनेज साफ करण्यासाठी पाच हजार लिटर जेटिंग क्षमता व तीन हजार लिटरची गाळ व कचरा शोषून घेण्याची क्षमता असलेल्या या अत्याधुनिक मशीन मुळे तुंबलेल्या गटारी तातडीने स्वच्छ करणे शक्य होणार आहे. 55 लाख रुपये किमतीच्या या नवीन मशीन मुळे मनुष्याने गटारीमध्ये उतरून गटार साफ करण्याची गरज नसून यामुळे धोका टाळणार आहे. अधिक वेगवान सुरक्षित व परिणामकारक गटारींची साफसफाई या आधुनिक यंत्रामुळे होणार आहे. हा राज्यामध्ये पहिला अभिनव प्रकल्प राबवला जात आहे.
यावेळी बोलताना माजीमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, 1991 पासून डॉ.सुधीर तांबे नगराध्यक्ष झाल्यापासून नगरपालिकेने अत्यंत चांगल्या सुविधा नागरिकांना दिल्या आहेत. शांतता सुव्यवस्था बंधुभावाचे वातावरण हे संगमनेरचे वैशिष्ट्य आहे. हि परंपरा आपल्याला जपायची असून यापुढील काळात सर्व नवीन पदाधिकाऱ्यांनी अधिक जोमाने काम करताना संगमनेर शहराचा लौकिक वाढवण्याबरोबर संगमनेरची राजकीय संस्कृती अधिक बळकट करण्यासाठी काम करावे. याचबरोबर स्वच्छता व नीटनेटकेपणा आणि जास्तीत जास्त चांगले काम यामधून संगमनेर शहराचा देशात लौकिक वाढवावा असे आवाहन त्यांनी केले.
तर आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात व मा.आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरची राजकीय व सामाजिक सांस्कृतिक पुढे नेताना अत्याधुनिक पद्धतीने संगमनेर 2.0 अंतर्गत काम करण्यासाठी सर्व नवीन पदाधिकारी कटिबद्ध असून या नवीन ड्रेनेज सफाई यंत्रामुळे भूमिगत गटारी साफ होण्यासाठी मदत असून या पुढील काळातही नवनवीन तंत्राचा वापर करून जास्तीत जास्त चांगल्या सुविधा नागरिकांना दिल्या जातील.
तर डॉ.मैथिलीताई तांबे म्हणाल्या की, सर्व नागरिकांच्या सहकार्यातून संगमनेर शहराला आणखी पुढे नेण्यासाठी आपण काम करू असे त्या म्हणाल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी दयानंद गोरे यांनी केले तर अमजद पठाण यांनी आभार मानले. यावेळी शहरातील नागरिक युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



