आपला जिल्हा
गणेश उत्सवानिमित्त सोनारी गावात वृक्षारोपण

कोपरगाव विजय कापसे दि ३१ ऑगस्ट २०२५– कोपरगाव तालुक्याच्या प्रथम महिला आमदार स्नेहलता कोल्हे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त व गणेशउत्सव निमित्त सोनारी गावात संजीवनी युवा प्रतिष्ठान व सोनारी येथील काल भैरवनाथ तरुण मित्र मंडळ यांच्या वतीने विविध देशी वृक्षांची लागवड करत गणेशोत्सव साजरा करण्यात आला.





