आपला जिल्हा

कोपरगाव तालुका आरोग्य अधिकारी बनले निक्षय मित्र

कोपरगाव तालुका आरोग्य अधिकारी बनले निक्षय मित्र
डॉ विकास घोलप यांचे माणूसकीचे दर्शन
जाहिरात आत्मा

कोपरगाव विजय कापसे दि २८ जानेवारी २०२५केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री क्षयरोग मुक्त भारत अभियाना अंतर्गत संपूर्ण भारतासह महाराष्ट्रात राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण हा कार्यक्रम राबविला जात आहे. या कार्यक्रमान्वये केंद्र सरकारने भारत देशाला क्षयरोग मुक्त करण्यासाठी २०२५ चे उद्दिष्ट ठेवले आहे. म्हणजेच एक लाख लोकसंख्येत क्षयरुग्णांचे प्रमाण ४५ पर्यंत खाली आणणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

जाहिरात
 याच अनुषंगाने क्षयरुग्णास व त्याच्या कुटुंबास मदतीचा हात म्हणून शासना कडून सरकारी व खाजगी रुग्णालयात नोंद झालेल्या क्षयरुग्णांना दरमहा एक हजार रुपये उपचार चालू असेपर्यंत केंद्र शासना कडून डीबीटी द्वारे दिले जातात. या व्यतिरिक्त क्षयरुग्णांना समाजाकडून आधार मिळावा तसेच त्या संबंधातील गैरसमज व भीती दूर व्हावी याकरिता केंद्र शासनाकडून भारतीय नागरिकांना आव्हान करण्यात आले आहे. की निक्षय मित्र म्हणून एक किंवा एकापेक्षा जास्त क्षयरुग्णांना दत्तक घेऊन फुड बास्केट उपचार कालावधीत देण्यासाठी पुढे यावे. या फूड बास्केटमध्ये गहू ,शेंगदाणा, गुळ,गोडेतेल, मुगडाळ, मसूर डाळ आदी वस्तूंचा समावेश होतो. या फूड बास्केटचा महिन्याचा अपेक्षित खर्च ५०० ते  ६०० रुपये आहे.

जाहिरात
केंद्र सरकारच्या या आवाहनाला अनुसरून तसेच शासकीय अधिकारी ही समाजाचं काही देणं लागतो या उत्कट भावनेतून कोपरगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर  विकास घोलप  यांनी तालुक्यातील एका क्षयरुग्णास दत्तक घेऊन त्यास फूड बास्केट उपलब्ध करून दिली.यावेळी त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांन समवेत सर्व विभागातील शासकीय कर्मचाऱ्यांना तसेच कोपरगाव तालुक्यातील व शहरातील नागरिकांना केंद्र शासनाच्या या सुचनेस प्रतिसाद देण्याचे आवाहन केले.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे