GPAT व GATE परीक्षेत आरजेएस फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे यश
GPAT व GATE परीक्षेत आरजेएस फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे यश
जाहिरात
Kopargaon vijay kapse दि १० एप्रिल २०२६– नॅशनल टेस्टिंग एजन्सी व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नवी दिल्ली यांच्या कडून घेण्यात आलेल्या GPAT व GATE सारख्या परीक्षेमध्ये राष्ट्रसंत जनार्दन स्वामी कॉलेज ऑफ फार्मसी च्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेले आहे या परीक्षांमध्ये अर्ज कॉलेजची विद्यार्थी गांगुर्डे विनायक सदाशिव (रँक: 4446 ), डोळस निर्मला शामराव (रँक: 7480) ,रोशनी कान्हा धडगा (रँक: 19112) यांनी GPAT सारख्या परीक्षांमध्ये अद्भुत पूर्व यश मिळवले तर धनश्री राजेंद्र कोलते (AIR: 9633) ह्या विद्यार्थिनी GATE सारखे परीक्षांमध्ये भव्य यश संपादन केले.
जाहिरात
महाविद्यालयातर्फे या स्पर्ध्यात्मक युगांसाठी मध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर वरील परीक्षण द्वारे स्वच्छ गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी वेगवेगळ्या कार्यशाळेचे आयोजन, गेस्ट लेक्चर सिरीज राबवण्यात येते.जाहिरात
त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेचे महत्त्व, परीक्षेचा नमुना अभ्यास कसा करावा, प्रभावी तयारीच्या रणनीती, अभ्यासक्रम विभागणी पद्धत स्मार्ट नोट्स तयार करण्याचे पद्धत त्यांनी देण्याचे काम करण्यात येते यासाठी प्राचार्य डॉ. नितीन जैन सर तसेच समन्वयक श्री.दादासाहेब कावडे सर यांनी विशेष मेहनत घेतली. संस्थेचे अध्यक्ष चांगदेव कातकडे, सचिव प्रसाद कातकडे, उद्योजक विजय कडू तसेच अभियंता दीपक कोटमे, प्रणित कातकडे यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.जाहिरात
हे यश संस्थेच्या शैक्षणिक उत्कृष्टतेच्या परंपरेला अधिक बळकटी देणारे आहे. भविष्यातही विद्यार्थी अशीच प्रगती करतील व संस्थेचे नाव उंचावतील, असा विश्वास प्राचार्य डॉ. नितीन जैन व्यक्त केला.प्राचार्य डॉ. नितीन जैन व उप प्राचार्या डॉ. उषा जैन यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या यशाचे अभिनंदन केले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.