आपला जिल्हा

के. जे. सोमैया महाविद्यालयाच्या एस्ट्रो क्लब तर्फे विविध उपक्रम साजरे 

के. जे. सोमैया महाविद्यालयाच्या एस्ट्रो क्लब तर्फे विविध उपक्रम साजरे

के. जे. सोमैया महाविद्यालयाच्या एस्ट्रो क्लब तर्फे विविध उपक्रम साजरे 

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १८ फेब्रुवारी २०२६के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात एस्ट्रो क्लब तर्फे विविध उपक्रम साजरे करण्यात आले. यावेळी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खगोलतज्ज्ञ मा.सुहास नाईक-साटम यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. या मार्गदर्शनात त्यांनी मोकळे आकाश व अवकाशीय ग्रहगोल मानवाच्या उत्सुकतेला सतत प्रोत्साहन देत आले आहेत. चंद्र व विविध नक्षत्रांनी मानवी जीवनाचे विविध अंगे व्यापून टाकली आहेत. डोक्यावरील विविध नक्षत्र व तारे मानवी मनाच्या अनंत इच्छाशक्तीचे प्रतीक आहेत असे उद्गार त्यांनी काढले. मा. सुहास नाईक-साटम हे 
राष्ट्रीय विज्ञान केंद्र मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी व नेहरू तारांगण मुंबई येथील  मुख्य कार्यक्रम अधिकारी या पदावर कार्यरत होते.

जाहिरात

या व्याख्यानाप्रसंगी अस्ट्रो क्लब चे समन्वयक डॉ. वसुदेव साळुंके यांनी प्रास्ताविकात या एस्ट्रो क्लब च्या माध्यमातून घेण्यात येत असणाऱ्या विविध आकाश निरीक्षण कार्यक्रमांची माहिती दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करतानाच आकाश संशोधनाचा मुख्य उद्देश विश्वाचे ज्ञान आत्मसात करून व्यक्ती ज्ञान वाढवणे असल्याचे म्हटले.

जाहिरात

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमोल चिने यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. निलेश पोटे यांनी केले. या कार्यक्रमासाठी मा.अरविंद औताडे, डॉ. गणेश चव्हाण, डॉ. बी. बी. भोसले,  डॉ.बी.डी. गव्हाणे डॉ.बी.एस. गायकवाड, डॉ. संजय दवंगे उपस्थित होते. तर प्रा. संपत माळी, प्रा.सुभाष सोनवणे, प्रा. जयश्री खंडिझोड यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. या क्लबच्या  वतीने रात्री आठ वाजता आकाश निरीक्षण कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले. यावेळी   सुहास नाईक-साटम यांनी आकाशातील विविध ग्रह, नक्षत्र, तारे, दीर्घिका यांची विस्तृत व मनोरंजक माहिती दिली. रात्री महाविद्यालयातील टेलिस्कोपच्या सहाय्याने गुरुग्रह व त्याचे उपग्रह यांचे विलोभनीय दर्शन खगोल प्रेमींना दाखवण्यात आले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे