यशोधन मोफत लायब्ररीचा विद्यार्थ्यांकडून मोठा वापर; स्पर्धा परीक्षेसह नीट सीईटीसह विविध परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मोठा फायदा

यशोधन मोफत लायब्ररीचा विद्यार्थ्यांकडून मोठा वापर; स्पर्धा परीक्षेसह नीट सीईटीसह विविध परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मोठा फायदा
डॉ जयश्रीताई थोरात यांच्या संकल्पनेमुळे अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमधून संधी

Sangmner vijay kapse दि १२ मे २०२६–महाराष्ट्राचे माजी महसूल व शिक्षण मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सततच्या विकास कामांमधून संगमनेर तालुका हा राज्यात अग्रगण्य बनवला. विकसित व प्रगतशील असलेल्या संगमनेर तालुक्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या शैक्षणिक सुविधा मिळत असून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसह विविध पुस्तके सहज उपलब्ध व्हावी याकरता डॉ जयश्रीताई थोरात यांच्या संकल्पनेतून यशोधन कार्यालयात सुरु झालेल्या लायब्ररीमुळे अनेक विद्यार्थ्यांना चांगली संधी मिळाली आहे.

मध्यवर्ती यशोधन जनसंपर्क कार्यालयात कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात यांच्या संकल्पनेतून स्वतंत्र लायब्ररी विभाग सुरू करण्यात आला आहे. यामध्ये सुमारे 3800 विविध पुस्तके असून स्पर्धा परीक्षांसह इंजीनियरिंग मेडिकलची सीईटी नीट जेईई, पदवी तर अभ्यासक्रम सिटी अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थी व विद्यार्थिनींना या मोफत लायब्ररीचा मोठा फायदा होत आहे. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी या लायब्ररी मधून दररोज पुस्तकांची देवाणघेवाण करत असून सर्वांना हे पुस्तके सहज उपलब्ध होत आहेत.
मागील वर्षभरात 8622 विद्यार्थी व युवकांनी या लायब्ररीचा फायदा घेतला असून तलाठी ,पोलीस यासह एमपीएससी व यूपीएससी मध्ये अनेक विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे. याचबरोबर काही कादंबऱ्यांसह व्यक्तिमत्व विकासाची पुस्तके ही उपलब्ध असल्याने विद्यार्थी व युवक वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू केलेल्या या वाचनालयामधून तलाठी, ग्रामसेवक, पोलीस भरती, एमपीएससी ,यूपीएससी ,नेट, सेट, बँकिंग, इंजिनिअरिंग ,मेडिकल यांसह विविध स्पर्धा परीक्षांचे सुमारे 2400 पुस्तके उपलब्ध आहेत सकाळी 9 ते 5 या वेळेत विद्यार्थ्यांना या मोफत लायब्ररीचा फायदा मिळत आहे. याचबरोबर विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी बारावी तसेच पदवी परीक्षेनंतर करियर बाबत मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे पीएचडीचे मार्गदर्शक डॉ. नितीन भांड व अभियंता रामदास तांबडे यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षेतील यश हे तालुक्यासाठी अभिमानास्पद –डॉ.जयश्रीताई थोरात
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहर हे गुणवत्तेचे शैक्षणिक केंद्र म्हणून राज्यात पुढे आले आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर करिअरच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देताना एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून मोफत अभ्यासिका सुरू केली आहे. याचा लाभ तालुक्यातील अनेक युवक व युवती घेत असून यामधून अनेकांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवले ही तालुक्यासाठी अत्यंत अभिमानाचे आहे–डॉ जयश्रीताई थोरात
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये मोठी गुणवत्ता –ऋतुजा गायकवाड IAS
डॉक्टर जयश्रीताई थोरात यांनी तालुक्यातील युवक व विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या मोफत लायब्ररी मुळे अनेक विद्यार्थ्यांना चांगली संधी मिळणार आहे. अभ्यासातील सातत्य अत्यंत महत्त्वाचे असून मोठी स्वप्न पहा. सकारात्मक मानसिकता ठेवा. नाराज होऊ नका कारण यश सहजासहजी मिळत नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये मोठी गुणवत्ता असून उपलब्ध संधीचा लाभ घ्या
ऋतुजा गायकवाड IAS







