साई शक्ती मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त अभिवादन

साई शक्ती मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त अभिवादन
साई शक्ती मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त अभिवादन
Kopargaon vijay kapse दि १४ एप्रिल २०२६- भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष परशराम साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली व संस्थेच्या सचिव सुचित्रा साबळे यांच्या अध्यक्षतेखाली साई शक्ती इंग्लिश मीडियम स्कूल कासली मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.

भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१४ एप्रिल, १८९१ – ६ डिसेंबर, १९५६) यांची जयंती संबंध जगभर मोठ्या उत्साहात साजरी केली जाते ते भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना ‘आधुनिक भारताचे शिल्पकार’ किंवा ‘आधुनिक भारताचे निर्माते’ असेही त्यांना म्हणतात.

याप्रसंगी शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षकांनी आपल्या भाषणातून त्यांच्या महान कार्याची माहिती दिली तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुशांत साबळे, विलास चव्हाण, सोनाली कापसे, अलका जाधव, आयुब शेख आदी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.



