आपला जिल्हा

महंत रामगिरी महाराजांची धोत्रे येथील ग्रामदैवतास भेट

महंत रामगिरी महाराजांची धोत्रे येथील ग्रामदैवतास भेट
नुकताच संपन्न झाला पुरातन मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा

कोपरगाव विजय कापसे दि १ नोव्हेंबर २०२३श्री क्षेत्र सरला बेटचे महंत रामगिरीजी महाराज यांनी नुकतीच कोपरगाव तालुक्यातील श्री क्षेत्र धोत्रे येथे नुकत्याच १२०० वर्षपूर्वीच्या जोगेश्वरी व भैरवनाथ मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा झालेल्या मंदिरास भेट देत पाहणी केली.

जाहिरात

 सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव तालुक्यातील श्री क्षेत्र धोत्रे येथील स्वयंभू ग्रामदैवत आई जोगेश्वरी व भैरवनाथ यांच्या वज्रलेप केलेल्या १२०० वर्ष पूर्वीच्या पुरातन असलेल्या मूर्त्याची प्राणप्रतिष्ठा मोठ्या जल्लोषात करण्यात आलेल्या मंदिरास  जुन्या मूर्त्या मध्ये किती देवपण व जागृत असतात याचे महत्व सांगत पंढरपूर  येथील विठ्ठल मूर्तींचे व  वणी येथील सप्तशृंगी देवी मूर्तीचे उदाहरण देऊन धोत्रे गावातील पोटे परिवार, करडे परिवार  व ग्रामस्थ यांनी एकत्र येऊन पुरातन मूर्तीची केलेली  प्राणप्रतिष्ठा केली ही नक्कीच कौतुकास्पद बाब असल्याचे सांगितले.

जाहिरात

  या प्रसंगी महंत रामगिरी महाराजांचा सत्कार माधव पोटे, पंडित पोटे, सागर करडे, आदिनाथ पोटे, संजयपोटे, सुखदेव पोटे आदी सह ग्रामस्थांनी केला.

जाहिरात
या  प्रसंगी पोटे कोपरगाव,वैजापूर, धोत्रे व परिसरातून बहुसंख्य भाविक तसेच  पोटे, करडे, चव्हाण, जामदार आदी सह धोत्रे गावचे  ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे