आत्मा मालिक गुरुकुलात शिक्षक दिन उत्साहात साजरा
आत्मा मालिक गुरुकुलात शिक्षक दिन उत्साहात साजरा
आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुल येवला येथे डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांना अभिवादन करून शिक्षक दिन उत्साहात साजरा झाला
येवला प्रतिनिधी दि ६ सप्टेंबर २०२४– येवला येथील आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम गुरुकुल मध्ये गुरुवार दि ५ सप्टेंबर २०२४ रोजी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांना अभिवादन करून शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी अध्यक्ष हनुमंत भोंगळे, स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य हेमंत शाह,नेहा शाह, मठाधिपती संत कंकाली बाबा, प्राचार्य तुषार कापसे उपस्थित होते.या प्रसंगी हनुमंत भोंगळे यांनी गुरुकुलातील सर्व शिक्षकांना भेटवस्तू देऊन शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. येवला गुरुकुलाच्या यशस्वी वाटचाली मागे सर्व शिक्षक, प्राचार्य आहेत तसेच यापुढेही आपण प्रथम क्रमांक वर राहण्यासाठी तयारी करावी.शिक्षकांमुळे मुलं सुसंस्कृत बनतात. शिक्षक हे भावी पिढीला घडवण्याचे काम करत असतात, या जगात सर्वश्रेष्ठ गुरुआहेत, गुरुच ब्रह्मा विष्णू महेश आहेत, त्यामुळे गुरुचे महत्त्व अतिव आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपले प्रथम गुरु,आई द्वितीय गुरु आपले वडील आणि तृतीय गुरु आपले सर्व शिक्षक यांचा सर्वांचा योग्य तो सन्मान ठेवून आयुष्यात यशस्वी व्हावे असे सांगितले.
या प्रसंगी नववी व दहावीतील विद्यार्थ्यांनी शिक्षक म्हणून नर्सरी ते आठवीवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अध्यापन केले तर नववीतील अश्विन कुमकर याने प्राचार्य तुषार कापसे यांची भूमिका साकारली. तसेच भक्ती जगताप, शार्वी लग्गड, वेदिका आहेर, श्रावणी वरोडे,वेदिका लचके, मनुश्री वडनेरे,स्नेहल थळकर,आर्यन बोरसे, प्रणव थळकर,साई काळंगे,सार्थक शिंदे,पार्थ महाजन, समर्थ पल्ले,हिमांशु दानेज,आयुष माळवे, गीत गुप्ता,संस्कृती शिंदे ,मयुरी मगर, सृष्टी घोडके, राधिका परदेशी,समृद्धी गुप्ता ,वेदांती हंडी,स्पंदन लहरे, जयेश निकुंभ या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारली व अध्यापन केले.
तसेच श्रेयस चव्हाण ,साई नवले यांनी शिपायाची भूमिका साकारली. इयत्ता आठवीतील विद्यार्थिनींनी शिक्षक दिनानिमित्त सर्व महिला शिक्षकांसाठी संगीत खुर्ची व हाव-भावावरून चित्रपटाचे नाव ओळखणे या खेळांचे आयोजन केले होते. सर्वात शेवटी शिक्षक झालेल्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व दिवस भरातील अनुभव सांगितले. शिक्षक होणे म्हणजे किती कठीण काम आहे याची माहिती त्यांनी सांगितले, विद्यार्थी घडवताना शिक्षकांना किती कष्ट घेऊन तयारी करून, विविध उपक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना अध्यापन करावे लागते याचे महत्त्व त्यांना कळाले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.