काळे गट

आपली खरेदी आपल्या गावात’ उपक्रमातून  कोपरगावच्या बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल वाढणार –  पुष्पाताई काळे

आपली खरेदी आपल्या गावात‘ उपक्रमातून  कोपरगावच्या बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल वाढणार –  पुष्पाताई काळे

कोपरगाव विजय कापसे दि १ नोव्हेंबर २०२३ :- कोपरगावच्या शहराच्या बाजारपेठेला उर्जीतावस्था आणून देण्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी शहरविकासाला प्राधान्य दिल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या खरेदीसाठी पुन्हा एकदा कोपरगाव शहरात येवू लागले आहे. यावर्षी दिवाळीच्या खरेदीसाठी आ. आशुतोष काळे यांनी ‘आपली खरेदी आपल्या गावात’ हा उपक्रम हाती घेतला असून त्या उपक्रमाला प्रतिसाद देवून व्यापारी महासंघ व किराणा मर्चंट्स असोसिएशनने सुरु केलेला ‘आपली खरेदी आपल्या गावात’ ग्राहक सन्मान योजना कौतुकास्पद असून त्यामुळे कोपरगावच्या बाजार पेठेतील आर्थिक उलाढाल वाढणार असल्याचा विश्वास गौतम सहकारी बँकेच्या माजी संचालिका व प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा  पुष्पाताई काळे यांनी व्यक्त केला आहे.

जाहिरात

कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ व कोपरगाव तालुका किराणा मर्चंट्स असोसिएशन यांच्या वतीने दिवाळीनिमित्त सुरू करण्यात आलेल्या ‘आपली खरेदी आपल्या गावात’ ह्या ग्राहक सन्मान योजनेचे उदघाटन नुकतेच गौतम बँकेच्या माजी संचालिका व प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा  पुष्पाताई काळे त्यांच्या हस्ते करण्यात आल याप्रसंगी त्या बोलत होत्या.

जाहिरात

त्या पुढे म्हणाल्या की, दिवाळी सण हा प्रत्येकासाठी आनंदाचा सण असतो त्यामुळे या सणाला इतर सणांच्या तुलनेत जरा जास्तच खरेदी केली जाते. हि खरेदी आपल्याच गावात झाली तर त्यामुळे निश्चितपणे आपल्याच माणसांचा आर्थिक फायदा होतो. परंतु मागील दोन ते तीन वर्षापासून ऑनलाईन खरेदीला नागरिकांचा मिळत असलेला प्रतिसाद, तसेच विविध सवलतीच्या योजनांचा भडीमार त्यामुळे दिवाळीच्या सणाला देखील बाजारपेठेत ग्राहकांची संख्या कमी असल्यामुळे छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. त्या पार्श्वभूमीवर आ. आशुतोष काळे यांच्या ‘आपली खरेदी आपल्या गावात’ या संकल्पनेला कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ व कोपरगाव तालुका किराणा मर्चंट्स असोसिएशन यांची साथ मिळाल्यामुळे  ग्राहकांना खरेदीवर मिळणाऱ्या लकी ‘ड्रॉ’ कुपन्सच्या माध्यमातून लाखो रुपयांची आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. रस्त्यावर बसणारा लक्ष्मी विक्रेता असेल किंवा रांगोळी, पणत्या विकणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांपासून मोठ्या व्यापाऱ्यांकडे खरेदी केल्यानंतर लकी ‘ड्रॉ’ कुपन्स मिळणार असल्यामुळे निश्चितपणे बाजार पेठ फुलणार आहे. व्यावसायिकांनी देखील ग्राहकांसाठी मालाचा उच्च दर्जा, वाजवी दर व नम्र सेवा या त्रीसूत्रीचा वापर करून व्यवसाय वृद्धिंगत करावा व ग्राहकांनी देखील आपली खरेदी आपल्याच गावात करावी असे आवाहन  पुष्पाताई काळे यांनी यावेळी केले.

जाहिरात

याप्रसंगी राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुधीर डागा, तुलसीदास खुबाणी, पराग संधान, महावीर सोनी, अजित लोहाडे, गुलशन होडे, प्रदीप साखरे, राजकुमार बंब, सतिश नीलकंठ, प्रितेश बंब, पंकज होडे, बाबासाहेब जंगम, शामभाऊ जंगम, भरत मोरे, केशव भवर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, माजी नगरसेवक मंदार पहाडे, दिनकर खरे, मायादेवी खरे, राजेंद्र खैरनार, आकाश डागा, एकनाथ गंगूले, शैलेश साबळे, अनिरुद्ध काळे, रुपाली कळसकर, सुषमा पांडे, शितल वायखिंडे आदी उपस्थित होते.

आपली खरेदी आपल्या गावात’ ह्या ग्राहक सन्मान योजनेचे उदघाटन प्रसंगी पुष्पाताई काळे व मान्यवर.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे