नदीच्या संरक्षण भिंती लगत चेंबरचे काम करत पुलावरील खड्डे बुजवावे-ढाकणे
नदीच्या संरक्षण भिंती लगत चेंबरचे काम करत पुलावरील खड्डे बुजवावे-ढाकणे

कोपरगाव विजय कापसे दि ५ सप्टेंबर २०२४– कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या पवित्र अशा गोदावरी नदी वर असलेल्या बेट भागाला व शहराला जोडणाऱ्या मौनगिरी सेतू लगत असलेल्या ढासलेल्या चेंबर ची दुरुस्ती करत या पुलावर पडलेले खड्डे तत्काळ बुजविण्यात यावे अशी मागणी गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांनी कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक सुहास जगताप यांना देत केली असून सदर निवेदनाची प्रत नगरपालिकेच्या वतीने संबंधित विभागाच्या सहाय्यक रचनाकार अधिकारी रश्मी प्रधान यांनी स्वीकारली

गोदामाई प्रतिष्ठान चे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे हे आपल्या प्रतिष्ठान मार्फत गेल्या अनेक वर्षांपासून गोदावरी नदी स्वच्छतेचे काम करत असून त्यांनी कोपरगाव नगरपालिकेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, के जे सोमय्या कॉलेज च्या समोरील गट्टारीचे चेंबर ढसळे असुन जर एखादा मोठा पाऊस झाला तर चेंबर बरोबरच गोदावरी नदी ची संरक्षण भिंत पडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे कै. सुर्यभान वहाडणे पा.घाटाच्या जवळ आणि बेट कोपरगांव ला जोडणारा गोदावरी नदीवरील पुल यांच्या मध्ये खूप मोठा खड्डा पडला आहे यामुळे पुलाला आणि घाटाला धोका निर्माण झाला आहे.

तरी आपण त्वरित लक्ष घालून हे काम तातडीने पूर्ण करावे कारण दोन दिवसांवर गणपती बाप्पा चे आगमन होते आहे यामुळे या भागात नागरीकांची रेलचेल मोठ्या प्रमाणात असणार आहे. यातून दुर्घटना देखील होऊ शकते तसेच या पुलावरील खड्डे देखील तत्काळ दुरुस्त करावे अशी मागणी ढाकणे यांनी निवेदनाद्वारे केली आहे .




